S M L

हॉल तिकीट न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकास चोप दिला

23 फेब्रुवारीकाल मंगळवारपासून 12 वीची परीक्षा सुरू झाली. नागपूर जिल्ह्यातल्या मौदा इथल्या गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरला बसता आलं नाही. मुख्याध्यापक डी.एन.वानखेडे यांनी परीक्षेसंदर्भातल्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या 31 विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळू शकलं नाही. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक वानखेडे यांना चांगलाच चोप दिला आणि त्यांच्या तोंडाला काळं फासलं. मुख्याध्यापकांची पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 12:30 PM IST

हॉल तिकीट न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकास चोप दिला

23 फेब्रुवारी

काल मंगळवारपासून 12 वीची परीक्षा सुरू झाली. नागपूर जिल्ह्यातल्या मौदा इथल्या गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरला बसता आलं नाही. मुख्याध्यापक डी.एन.वानखेडे यांनी परीक्षेसंदर्भातल्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या 31 विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळू शकलं नाही. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक वानखेडे यांना चांगलाच चोप दिला आणि त्यांच्या तोंडाला काळं फासलं. मुख्याध्यापकांची पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close