S M L

पुण्यात कचरामुक्तीच्या उपक्रमाला सुरूवात

23 फेब्रुवारीपुणे महानगरपालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया आणि महाराष्ट्र प्लॅस्टीक असोसिएशन यांनी मिळून निर्मळ कात्रज- देखणं कात्रज हा कचरामुक्तीचा उपक्रम आज सुरू केला आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून वॉर्डातल्या कचर्‍याची वॉर्डातच विल्हेवाट लावण्याचा हा पुण्यातला प्रथमदर्शी प्रकल्प आहे.संत गाडगेबाबांच्या जन्मदिनी याचं महापौरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. पुण्याचा सर्व कचरा आत्तापर्यंत उरळी देवाची- फुरसुंगी या कचरा डेपोत टाकण्यात येत होता पण आता ओपन डंपींग बंद करण्यात आलं आहे. या नव्या प्रकल्पानुसार स्वच्छ या संघटनेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन ओला- सुका कचरा गोळा करणार आहेत. त्याकरता त्यांना गाड्या पुरवण्यात आल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 05:06 PM IST

पुण्यात कचरामुक्तीच्या  उपक्रमाला सुरूवात

23 फेब्रुवारी

पुणे महानगरपालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया आणि महाराष्ट्र प्लॅस्टीक असोसिएशन यांनी मिळून निर्मळ कात्रज- देखणं कात्रज हा कचरामुक्तीचा उपक्रम आज सुरू केला आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून वॉर्डातल्या कचर्‍याची वॉर्डातच विल्हेवाट लावण्याचा हा पुण्यातला प्रथमदर्शी प्रकल्प आहे.संत गाडगेबाबांच्या जन्मदिनी याचं महापौरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. पुण्याचा सर्व कचरा आत्तापर्यंत उरळी देवाची- फुरसुंगी या कचरा डेपोत टाकण्यात येत होता पण आता ओपन डंपींग बंद करण्यात आलं आहे. या नव्या प्रकल्पानुसार स्वच्छ या संघटनेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन ओला- सुका कचरा गोळा करणार आहेत. त्याकरता त्यांना गाड्या पुरवण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close