S M L

एका मंत्र्याला आता घरी जाण्याची वेळ आली आहे -अण्णा हजारे

23 फेब्रुवारीराज्यातल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याला आता घरी जाण्याची वेळ आली आहे असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिला आहे. महाराष्ट्रात मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून आतापर्यंत सहा मंत्र्यांना घरी पाठवले आहे. आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असलेल्या एका मंत्र्याला घरी जाण्याची वेळ आली आहे. त्या मंत्र्याला घरी पाठवण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करत लोकांच्या प्रतिक्रियाही घेणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. पण हा मंत्री कोण ते मंत्री घरी गेल्यानंतरच कळेल असं म्हणत अण्णांनी नाव सांगायला नकार दिला. त्याचबरोबर आदर्शची तपासणी पारदर्शक नाही आणि आदर्श प्रकरणी दोषी आढळलेले आतापर्यंत जेलमध्ये का गेले नाहीत असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 05:26 PM IST

एका मंत्र्याला आता घरी जाण्याची वेळ आली आहे -अण्णा हजारे

23 फेब्रुवारी

राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याला आता घरी जाण्याची वेळ आली आहे असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिला आहे. महाराष्ट्रात मी माहिती अधिकाराच्या माध्यमातून आतापर्यंत सहा मंत्र्यांना घरी पाठवले आहे. आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असलेल्या एका मंत्र्याला घरी जाण्याची वेळ आली आहे. त्या मंत्र्याला घरी पाठवण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करत लोकांच्या प्रतिक्रियाही घेणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. पण हा मंत्री कोण ते मंत्री घरी गेल्यानंतरच कळेल असं म्हणत अण्णांनी नाव सांगायला नकार दिला. त्याचबरोबर आदर्शची तपासणी पारदर्शक नाही आणि आदर्श प्रकरणी दोषी आढळलेले आतापर्यंत जेलमध्ये का गेले नाहीत असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close