S M L

अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या पोलिसाला 13 दिवसांची पोलीस कोठडी

23 फेब्रुवारीमुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी एसीपी अशोक ढवळे याला हेरॉईनच्या तस्करी प्रकरणात काल मंगळवारी अटक केली आहे. आज ढवळे याला कोर्टात हजर केलं असता त्याला आणि त्याच्या साथिदारंाना नऊ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पिवळ्या दिव्याच्या गाडीतून फिरणार्‍या अशोक ढवळेनं त्याच्या गाडीचा वापर केला हेरॉईनचं स्मगलिंग करण्यासाठी. अमर सिंग या मुंबईतील कुप्रसिद्ध ड्रग्स व्यापार्‍याला हेरॉईनची डिलिव्हरी करताना क्राईम ब्रांचनं त्याला रंगेहाथ अटक केली होती. ढवळे सोबत अमरसिंगलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांना 9 मार्च पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 05:48 PM IST

अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या पोलिसाला 13 दिवसांची पोलीस कोठडी

23 फेब्रुवारी

मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी एसीपी अशोक ढवळे याला हेरॉईनच्या तस्करी प्रकरणात काल मंगळवारी अटक केली आहे. आज ढवळे याला कोर्टात हजर केलं असता त्याला आणि त्याच्या साथिदारंाना नऊ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पिवळ्या दिव्याच्या गाडीतून फिरणार्‍या अशोक ढवळेनं त्याच्या गाडीचा वापर केला हेरॉईनचं स्मगलिंग करण्यासाठी. अमर सिंग या मुंबईतील कुप्रसिद्ध ड्रग्स व्यापार्‍याला हेरॉईनची डिलिव्हरी करताना क्राईम ब्रांचनं त्याला रंगेहाथ अटक केली होती. ढवळे सोबत अमरसिंगलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांना 9 मार्च पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close