S M L

मक्याच्या शेतात डोलतायत गांजाची रोपं !

24 फेब्रुवारीमक्याच्या शेतात डोलतायत गांजाची रोपं.....! हा कुठल्या कवितेचा मुखडा नाही तर ही वस्तुस्थिती आहे नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधली. इथं मक्याच्या शेतात चक्क गांजाची झाडं सापडली आहेत. टाकळी गावातल्या प्रभाकर भास्कर यानं मक्याच्या शेतात गांजाची शेती केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी या शेतात धाड घालून गांजाची अडीचशे झाडं ताब्यात घेतली. आरोपी प्रभाकरला मात्र याची कुणकूण लागल्यानं तो फरार झाला. गेल्याच आठवड्यात नाशिक मध्ये पोलीस आयुक्तालयासमोरच्या तिबेटीयन मार्केटमध्ये 66 किलो चरस सापडलं होतं. भद्रकाली परिसरातही काही महिन्यांपूर्वी गांजाचा साठा जप्त केला होता. त्यामुळे अंमली पदार्थांचा वाढता व्यापार हे पोलिसांपुढे मोठं आव्हानच झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2011 11:07 AM IST

मक्याच्या शेतात डोलतायत गांजाची रोपं !

24 फेब्रुवारी

मक्याच्या शेतात डोलतायत गांजाची रोपं.....! हा कुठल्या कवितेचा मुखडा नाही तर ही वस्तुस्थिती आहे नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधली. इथं मक्याच्या शेतात चक्क गांजाची झाडं सापडली आहेत. टाकळी गावातल्या प्रभाकर भास्कर यानं मक्याच्या शेतात गांजाची शेती केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी या शेतात धाड घालून गांजाची अडीचशे झाडं ताब्यात घेतली. आरोपी प्रभाकरला मात्र याची कुणकूण लागल्यानं तो फरार झाला. गेल्याच आठवड्यात नाशिक मध्ये पोलीस आयुक्तालयासमोरच्या तिबेटीयन मार्केटमध्ये 66 किलो चरस सापडलं होतं. भद्रकाली परिसरातही काही महिन्यांपूर्वी गांजाचा साठा जप्त केला होता. त्यामुळे अंमली पदार्थांचा वाढता व्यापार हे पोलिसांपुढे मोठं आव्हानच झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close