S M L

नवी मुंबईत दुहेरी हत्याकांडप्रकरणी 2 जणांना अटक

24 फेब्रुवारीनवी मुंबईतल्या जुईनगर इथे सोमवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्राँचने दोन जणांना अटक केली. हत्या झालेल्या विजय कुमार गुप्ता यांच्या नातलगांपैकीच काहींनी ही सुपारी दिली असल्याची माहिती पुढे येत आहे. हत्येनंतर दोनच दिवसात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. यामध्ये मुन्नाकुमार दुबे आणि सिराजूल बरकत शेख या दोन शूटर्संना पोलिसांनी अटक केली. पण या हत्येत सहभाग असल्याचा संशय असलेली विजयकुमार गुप्ता यांनी बहीण अद्यापही फरार आहे. या बहिणीनंच ही सुपारी दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजय कुमार आणि सुमन यांच्या हत्येचं कारण कौटुंबिक वादातून असल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट होतं आहे. आता विजयकुमार यांच्या बहिणीला अटक झाल्यानंतरच या हत्याकांडाचं गूढ उलगडेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2011 11:26 AM IST

नवी मुंबईत दुहेरी हत्याकांडप्रकरणी 2 जणांना अटक

24 फेब्रुवारी

नवी मुंबईतल्या जुईनगर इथे सोमवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्राँचने दोन जणांना अटक केली. हत्या झालेल्या विजय कुमार गुप्ता यांच्या नातलगांपैकीच काहींनी ही सुपारी दिली असल्याची माहिती पुढे येत आहे. हत्येनंतर दोनच दिवसात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. यामध्ये मुन्नाकुमार दुबे आणि सिराजूल बरकत शेख या दोन शूटर्संना पोलिसांनी अटक केली. पण या हत्येत सहभाग असल्याचा संशय असलेली विजयकुमार गुप्ता यांनी बहीण अद्यापही फरार आहे. या बहिणीनंच ही सुपारी दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजय कुमार आणि सुमन यांच्या हत्येचं कारण कौटुंबिक वादातून असल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट होतं आहे. आता विजयकुमार यांच्या बहिणीला अटक झाल्यानंतरच या हत्याकांडाचं गूढ उलगडेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close