S M L

मुंडेंच्या भूमिकेला गडकरींचा पाठिंबा

24 फेब्रुवारीकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज्यातून घालवायचं असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं असं मत गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलं होतं. त्यात त्यांनी मनसेशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी चर्चा केली आहे आणि पक्षाच्या कोअर कमिटीत यावर चर्चा करणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मनसेशी युती करण्यास शिवसेनेनं विरोध दर्शवला असला तरी भाजपनं आपली भूमिका आता अधिक ताठर केल्याचं यातून दिसतं आहे. तर तिकडे राज ठाकरेंनीही आपण एकटेच जाणार असल्याचं स्पष्ट करुनही भाजपनं आपली भूमिका का कायम ठेवली याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2011 12:41 PM IST

मुंडेंच्या भूमिकेला गडकरींचा पाठिंबा

24 फेब्रुवारी

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज्यातून घालवायचं असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं असं मत गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलं होतं. त्यात त्यांनी मनसेशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी चर्चा केली आहे आणि पक्षाच्या कोअर कमिटीत यावर चर्चा करणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मनसेशी युती करण्यास शिवसेनेनं विरोध दर्शवला असला तरी भाजपनं आपली भूमिका आता अधिक ताठर केल्याचं यातून दिसतं आहे. तर तिकडे राज ठाकरेंनीही आपण एकटेच जाणार असल्याचं स्पष्ट करुनही भाजपनं आपली भूमिका का कायम ठेवली याची चर्चा आता सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2011 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close