S M L

एसएमएस वरून ले. कर्नल पुरोहितचा मालेगाव स्फोटांतला सहभाग उघड

6 नोव्हेंबर, मुंबईसुधाकर, कांबळेमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेला लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हा या स्फोटातल्या आरोपींच्या सतत संपर्कात होता. त्याने या लोकांना अनेक एसएमएस पाठवल्याचं तपासात उघड झालं आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितनं मालेगावमध्ये स्फोट झाल्यानंतर लगेचच आरोपींना एक एसएमएस पाठवला होता. त्यात म्हटलं होतं ' काळजी करू नका, तुमचं सिम कार्ड बदला. ' बॉम्बस्फोट झाल्यामुळे एटीएसचं पथक मालेगावला पोहोचलं होतं. या पथकाच्या तपासावर पुरोहितची बारीक नजर होती. या पथकाने मालेगाव सोडताच लेफ्टनटं कर्नलचा दुसरा एसएमएस आरोपींकडे पोहचला ' कॅट इज आउट ऑफ द बॅग. ' म्हणजे एटीएसचे अधिकारी परतले आहेत.स्फोटासंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंग हिला पकडल्यानंतर पुरोहितने आणखी एक एसएमएस पाठवला. हाही सांकेतिक होता.त्यात म्हटलं होतं, ' सिंग हॅड सिंग ' म्हणजे साध्वीला अटक झालीय.आणि ती आता सगळं पोलिसांना सांगणार आहे. यानंतर एटीएसचे अधिकारी काय कारवाई करतायत, यावरही अर्थातच पुरोहितचं बारीक लक्ष होतं. याबाबतचा एक एसएमएस पुन्हा त्याने इतर आरोपींना पाठवला. ' वी आर ऑन द रडार ऑफ एटीएस. ' म्हणजेच एटीएस आपल्या मागावरआहे. मधल्या काळात पुरोहितनं श्यामलाल साहू ,रमेश उपाध्याय,समीर कुलकर्णी आणि अजय वाईरकर या आरोपींना आणखी एक एसएमएस पाठवला. त्यात त्याने म्हटलं होतं ' डिलीट माय मोबाईल नंबर अ‍ॅण्ड डोन्ट कॉन्टॅक्ट मी. ' हेच एसएमएस प्रसाद पुरोहितचा बॉम्बस्फोटातला तपास उघड करणारे ठरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2008 08:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2008 08:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close