S M L

ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौडीला सुरूवात

25 फेब्रुवारीयंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 7 विकेट आणि 16 ओव्हर्सनं दणदणीत पराभव केला. न्यूझीलंडने विजयासाठी 207 रन्सचे माफक आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियानं सुरुवातच दमदार केली. शेन वॉट्सन आणि ब्रॅड हॅडिननं पहिल्या विकेटसाठी 133 रन्सची पार्टनरशिप केली. हॅडिन 55 तर वॉट्सन 62 रन्सवर आऊट झाले. तिसर्‍या क्रमांकावर आलेला कॅप्टन रिकी पॉण्टिंग झटपट आऊट झाला. पण यानंतर मायकेल क्लार्क आणि कॅमेरुन व्हाईटनं आणखी पडझड होऊ न देता ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी न्यूझीलंडची सर्व इनिंग अवघ्या 206 रन्सवर ऑलआऊट झाली. नॅथन मॅक्युलमने एकाकी झुंज देत 52 रन्स केल. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल जॉन्सनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2011 01:09 PM IST

ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौडीला सुरूवात

25 फेब्रुवारी

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 7 विकेट आणि 16 ओव्हर्सनं दणदणीत पराभव केला. न्यूझीलंडने विजयासाठी 207 रन्सचे माफक आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियानं सुरुवातच दमदार केली. शेन वॉट्सन आणि ब्रॅड हॅडिननं पहिल्या विकेटसाठी 133 रन्सची पार्टनरशिप केली. हॅडिन 55 तर वॉट्सन 62 रन्सवर आऊट झाले. तिसर्‍या क्रमांकावर आलेला कॅप्टन रिकी पॉण्टिंग झटपट आऊट झाला. पण यानंतर मायकेल क्लार्क आणि कॅमेरुन व्हाईटनं आणखी पडझड होऊ न देता ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी न्यूझीलंडची सर्व इनिंग अवघ्या 206 रन्सवर ऑलआऊट झाली. नॅथन मॅक्युलमने एकाकी झुंज देत 52 रन्स केल. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल जॉन्सनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2011 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close