S M L

महाराष्ट्राला 20 नव्या एक्सप्रेस !

25 फेब्रुवारीमागच्या वर्षा महाराष्ट्राला ठेंगा दाखवणार्‍या रेल्वे मंत्र्यांनी यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्रावर ममता दाखवली. अर्थात ठाकुर्लीचं गॅस पॉवर स्टेशन वगळता, राज्यात इनफ्रास्ट्रक्चरल फारसं काही नाही मात्र जवळपास 20 च्या आसपास नव्या एक्सप्रेस आणि पॅसेंजरची घोषणा करून ममतांनी महाराष्ट्राला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.आज शुक्रवारी रेल्वे बजेट सादर करताना 'सबको मिलेगा..आयेगा ..आगे है....'सगळ्यांनाच असं आश्वासन देत तर कधी अध्यक्षांच्या साक्षीनं दटावत ममता बॅनजीर्ंनी रल्वे बजेट सादर केलं. मागील वर्षातली महाराष्ट्रातील नागरिकांची नाराजी लक्षात घेऊन मग ममतांनीही नाखूश केलं नाही. ठाकुर्लीचं गॅस पॉवर स्टेशन, गडचिरोली - बस्तर नवा मार्ग, कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणे या घोषणा ममतांनी केल्या आहेत.राज्यासाठी जवळपास 25 नव्या गाड्यांची घोषणाही त्यांनी केली. त्यातही राज्यातल्या नागरिकांच्या ज्या मागण्या दुर्लक्षित होत्या त्याकडेही त्यांनी लक्ष दिलं. त्यामुळे राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया आहेत. असं असलं, तरी इनफ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट नाही, तसेच पायाभूत सुविधांकडंही दुर्लक्ष केल्यानं ममताच्या बजेटमध्ये फारसं काहीच नसल्याचं तज्ञाचं मत आहे. राज्यासाठी घोषणा आणि नव्या गाड्या तर भरपूर झाल्या. पण रेल्वे मंत्रालय त्याची त्वरित अमंलबजावणी करेल का. असाही प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. तरीही राज्यासाठी बजेटमध्ये समाधानकारक परिस्थिती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2011 03:13 PM IST

महाराष्ट्राला  20 नव्या एक्सप्रेस !

25 फेब्रुवारी

मागच्या वर्षा महाराष्ट्राला ठेंगा दाखवणार्‍या रेल्वे मंत्र्यांनी यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्रावर ममता दाखवली. अर्थात ठाकुर्लीचं गॅस पॉवर स्टेशन वगळता, राज्यात इनफ्रास्ट्रक्चरल फारसं काही नाही मात्र जवळपास 20 च्या आसपास नव्या एक्सप्रेस आणि पॅसेंजरची घोषणा करून ममतांनी महाराष्ट्राला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज शुक्रवारी रेल्वे बजेट सादर करताना 'सबको मिलेगा..आयेगा ..आगे है....'सगळ्यांनाच असं आश्वासन देत तर कधी अध्यक्षांच्या साक्षीनं दटावत ममता बॅनजीर्ंनी रल्वे बजेट सादर केलं. मागील वर्षातली महाराष्ट्रातील नागरिकांची नाराजी लक्षात घेऊन मग ममतांनीही नाखूश केलं नाही. ठाकुर्लीचं गॅस पॉवर स्टेशन, गडचिरोली - बस्तर नवा मार्ग, कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडणे या घोषणा ममतांनी केल्या आहेत.

राज्यासाठी जवळपास 25 नव्या गाड्यांची घोषणाही त्यांनी केली. त्यातही राज्यातल्या नागरिकांच्या ज्या मागण्या दुर्लक्षित होत्या त्याकडेही त्यांनी लक्ष दिलं. त्यामुळे राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया आहेत. असं असलं, तरी इनफ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट नाही, तसेच पायाभूत सुविधांकडंही दुर्लक्ष केल्यानं ममताच्या बजेटमध्ये फारसं काहीच नसल्याचं तज्ञाचं मत आहे. राज्यासाठी घोषणा आणि नव्या गाड्या तर भरपूर झाल्या. पण रेल्वे मंत्रालय त्याची त्वरित अमंलबजावणी करेल का. असाही प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. तरीही राज्यासाठी बजेटमध्ये समाधानकारक परिस्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2011 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close