S M L

बंगोलरमध्ये क्रिकेट सामन्याची काळ्या बाजारत विक्री !

अभीर व्ही पी, बंगळुरु27 फेब्रुवारीटीम इंडियाची मॅच पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सनी बंगलोरमध्ये पोलिसांच्या लाठ्या खाल्या होत्या. कोटा सिस्टिममुळे प्रेक्षकांना मॅचची तिकीट उपलब्ध होऊ शकली नाहीत, असं स्पष्टीकरण कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने दिलं होतं. पण तुमच्या खिशात जर पैसा असेल तर ब्लॅकमध्ये तुम्हाला हवी तेवढी तिकीट उपल्बध होतात. सीएनएन- आयबीएननं तिकीटांच्या काळा बाजाराचा पर्दाफाश केला.स्थळ- बंगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम... वेळ - दुपारी दोनची...भारत आणि इंग्लंड वन डे मॅचला सुरूवात होण्यापूर्वी काही मिनिटा आधी सीएनएन आयबीएनच्या स्पेशल टीमनं शोध घेतला मॅचच्या ब्लॅक तिकीटांचा. आणि त्यांना फार कष्ट करावे लागले नाहीत. सेहवाग सचिनची फटकेबाजी पहायची असेल तर तुम्हाला पोलिसांची लाठी खाण्याची काही गरज नाही. फक्त खिसा गरम पाहिजे. पण धक्कादायक गोष्ट ही की चक्क क्लब स्टँडची तिकीटही काळ्या बाजारात विकली जात होती. एरवी या स्टँडमध्ये फक्त अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच बसू शकतात. पण एका खुर्चीसाठी तेरा हजार रुपये मोजलेत तर तुम्हीही त्यांच्याबरोबर बसू शकालं. तुमचाही विश्वास बसत नसेल पण हे खर आहे. दोन दिवसांपूर्वी फॅन्सवर लाठीचार्ज झाला त्यालाही कारण काळा बाजार हेच होतं. खुली विक्री बंद असताना लोकांना अचानक कळलं एका खिडकीवर मॅचची तिकीटं मिळतात. आणि तिथे लोकांची झुंबड उडाली. तिकीटांसाठी रांग इथंही असते. पण बर्‍याचदा तिकीटाची खात्री असते. कारण इथं कोटा नाही. अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ कोटा व्यवस्थेला दोष देतायत. पण कोट्यामुळेच तिकीटांचा काळा बाजारही होतोय त्याचं काय? मधले एजंट त्यामुळे मालामाल होतात. नुकसान फक्त होते ते सामान्य क्रिकेट फॅन्सचं. जो क्रिकेटचा खरा चाहता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 27, 2011 06:11 PM IST

बंगोलरमध्ये क्रिकेट सामन्याची काळ्या बाजारत विक्री !

अभीर व्ही पी, बंगळुरु

27 फेब्रुवारी

टीम इंडियाची मॅच पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सनी बंगलोरमध्ये पोलिसांच्या लाठ्या खाल्या होत्या. कोटा सिस्टिममुळे प्रेक्षकांना मॅचची तिकीट उपलब्ध होऊ शकली नाहीत, असं स्पष्टीकरण कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने दिलं होतं. पण तुमच्या खिशात जर पैसा असेल तर ब्लॅकमध्ये तुम्हाला हवी तेवढी तिकीट उपल्बध होतात. सीएनएन- आयबीएननं तिकीटांच्या काळा बाजाराचा पर्दाफाश केला.

स्थळ- बंगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम... वेळ - दुपारी दोनची...भारत आणि इंग्लंड वन डे मॅचला सुरूवात होण्यापूर्वी काही मिनिटा आधी सीएनएन आयबीएनच्या स्पेशल टीमनं शोध घेतला मॅचच्या ब्लॅक तिकीटांचा. आणि त्यांना फार कष्ट करावे लागले नाहीत. सेहवाग सचिनची फटकेबाजी पहायची असेल तर तुम्हाला पोलिसांची लाठी खाण्याची काही गरज नाही. फक्त खिसा गरम पाहिजे. पण धक्कादायक गोष्ट ही की चक्क क्लब स्टँडची तिकीटही काळ्या बाजारात विकली जात होती. एरवी या स्टँडमध्ये फक्त अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच बसू शकतात. पण एका खुर्चीसाठी तेरा हजार रुपये मोजलेत तर तुम्हीही त्यांच्याबरोबर बसू शकालं.

तुमचाही विश्वास बसत नसेल पण हे खर आहे. दोन दिवसांपूर्वी फॅन्सवर लाठीचार्ज झाला त्यालाही कारण काळा बाजार हेच होतं. खुली विक्री बंद असताना लोकांना अचानक कळलं एका खिडकीवर मॅचची तिकीटं मिळतात. आणि तिथे लोकांची झुंबड उडाली. तिकीटांसाठी रांग इथंही असते. पण बर्‍याचदा तिकीटाची खात्री असते. कारण इथं कोटा नाही.

अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ कोटा व्यवस्थेला दोष देतायत. पण कोट्यामुळेच तिकीटांचा काळा बाजारही होतोय त्याचं काय? मधले एजंट त्यामुळे मालामाल होतात. नुकसान फक्त होते ते सामान्य क्रिकेट फॅन्सचं. जो क्रिकेटचा खरा चाहता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2011 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close