S M L

परिवहन कर्मचार्‍यांचा आंदोलनामुळे 20 कोटींचा फटका

28 फेब्रुवारीराज्यातील परिवहन कर्मचार्‍यांनी आज लेखणी बंद आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळे राज्यातल्या 44 आरटीओ ऑफिसमधील काम ठप्प झाली आहे. या एक दिवसाच्या लेखणी बंद आंदोलनामुळे परिवहन विभागाला जवळपास 20 कोटीच्या वसुलीचा फटका बसला आहे. अमरावतीच्या नागपूर गेट पोलिसांनी परिवहन अधिकारी प्रदीप लेहगावकर आणि वरिष्ठ लिपिक बोरसे यांना खोटया गुन्हयाचा ठपका ठेवून जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याचं महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे. 2009 साली नोंद झालेल्या एका वाहनाच्या कागदपत्रांची माहिती पोलिसांना हवी होती. पण 2009 ला त्या पदांवर कामावर नसलेल्या कर्मचार्‍यांना दोषी धरण्याचे काय कारण असा प्रश्न या कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे. गृहमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी या प्रकरणात मार्ग काढला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राज्य परिवहन संघटनेनं दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 11:25 AM IST

परिवहन कर्मचार्‍यांचा आंदोलनामुळे 20 कोटींचा फटका

28 फेब्रुवारी

राज्यातील परिवहन कर्मचार्‍यांनी आज लेखणी बंद आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळे राज्यातल्या 44 आरटीओ ऑफिसमधील काम ठप्प झाली आहे. या एक दिवसाच्या लेखणी बंद आंदोलनामुळे परिवहन विभागाला जवळपास 20 कोटीच्या वसुलीचा फटका बसला आहे. अमरावतीच्या नागपूर गेट पोलिसांनी परिवहन अधिकारी प्रदीप लेहगावकर आणि वरिष्ठ लिपिक बोरसे यांना खोटया गुन्हयाचा ठपका ठेवून जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याचं महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे. 2009 साली नोंद झालेल्या एका वाहनाच्या कागदपत्रांची माहिती पोलिसांना हवी होती. पण 2009 ला त्या पदांवर कामावर नसलेल्या कर्मचार्‍यांना दोषी धरण्याचे काय कारण असा प्रश्न या कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे. गृहमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी या प्रकरणात मार्ग काढला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राज्य परिवहन संघटनेनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close