S M L

झिंबाब्वेनं नोंदवला पहिला विजय

28 फेब्रुवारीवर्ल्ड कपच्या ग्रुप ए च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये झिंबाब्वेने कॅनडाचा 175 रननी धुव्वा उडवला. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर गर्दी केलेल्या मोजक्या लोकांना ततेंदू तैबूची जोरदार बॅटिंग बघायला मिळाली. फक्त दोन रननी त्याची सेंच्युरी हुकली. पण 99 बॉलच्या नेटक्या इनिंगमुळे त्याने टीमला तीनशे रनच्या जवळ नेलं. क्रेग आयर्विनने 81 बॉलमध्ये 85 रन करत त्याला चांगली साथ दिली. झिंबाब्वेने पन्नास ओव्हरमध्ये नऊ विकेटवर 298 रन केले. कॅनडाची टीम या स्कोअरला उत्तरच देऊ शकली नाही. त्यांची सुरुवातच सात रनवर तीन विकेट अशी भयानक होती. अखेर त्यांची अख्खी टीम 123 रनमध्ये आऊट झाली. झिंबाब्वेसाठी क्रेमर आणि रायन प्राईसने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या वर्ल्ड कपमधला झिंबाब्वेचा हा पहिला विजय ठरला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 02:49 PM IST

झिंबाब्वेनं नोंदवला पहिला विजय

28 फेब्रुवारी

वर्ल्ड कपच्या ग्रुप ए च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये झिंबाब्वेने कॅनडाचा 175 रननी धुव्वा उडवला. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर गर्दी केलेल्या मोजक्या लोकांना ततेंदू तैबूची जोरदार बॅटिंग बघायला मिळाली. फक्त दोन रननी त्याची सेंच्युरी हुकली. पण 99 बॉलच्या नेटक्या इनिंगमुळे त्याने टीमला तीनशे रनच्या जवळ नेलं. क्रेग आयर्विनने 81 बॉलमध्ये 85 रन करत त्याला चांगली साथ दिली. झिंबाब्वेने पन्नास ओव्हरमध्ये नऊ विकेटवर 298 रन केले. कॅनडाची टीम या स्कोअरला उत्तरच देऊ शकली नाही. त्यांची सुरुवातच सात रनवर तीन विकेट अशी भयानक होती. अखेर त्यांची अख्खी टीम 123 रनमध्ये आऊट झाली. झिंबाब्वेसाठी क्रेमर आणि रायन प्राईसने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या वर्ल्ड कपमधला झिंबाब्वेचा हा पहिला विजय ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close