S M L

आंदोलकांना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

01 मार्चमुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यात प्रकल्पग्रस्तांचा झालेला प्रखर विरोध दडपण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांकडून आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री मिठगवाणे गावातील 11 आंदोलक तसेच साखरी नाटे गावातील मच्छिमार नौकांवर काम करणार्‍या 18 नेपाळी खलाश्यांना अटक करण्यात आली. काल रात्री पुन्हा मिठगवाणे गावातल्या प्रल्पग्रस्तांचे नेते डॉ. मिलिंद देसाई यांनाही अटक करण्यात आली. त्यांना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ.मिलिंद देसाई यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणखीनच संतापले आहेत. डॉ. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावेळी प्रकल्पविरोधी भाषण करताना नारायण राणे रोखल होतं त्यामुळे देसाई यांना आपलं भाषण अर्धवट थांबवावे लागले होते. शनिवारीच्या मेळाव्यात डॉ. मिलिंद देसाई यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे कशा पद्धतीनं दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 12:00 PM IST

आंदोलकांना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

01 मार्च

मुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यात प्रकल्पग्रस्तांचा झालेला प्रखर विरोध दडपण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांकडून आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री मिठगवाणे गावातील 11 आंदोलक तसेच साखरी नाटे गावातील मच्छिमार नौकांवर काम करणार्‍या 18 नेपाळी खलाश्यांना अटक करण्यात आली. काल रात्री पुन्हा मिठगवाणे गावातल्या प्रल्पग्रस्तांचे नेते डॉ. मिलिंद देसाई यांनाही अटक करण्यात आली. त्यांना 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ.मिलिंद देसाई यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणखीनच संतापले आहेत. डॉ. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावेळी प्रकल्पविरोधी भाषण करताना नारायण राणे रोखल होतं त्यामुळे देसाई यांना आपलं भाषण अर्धवट थांबवावे लागले होते. शनिवारीच्या मेळाव्यात डॉ. मिलिंद देसाई यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे कशा पद्धतीनं दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close