S M L

वर्ल्ड कप ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरूवात

01 मार्चवर्ल्ड कप फायनलसाठी खुली तिकीट विक्री 11 मार्चपासून सुरु होत आहे. तर आजपासून ऑनलाईन तिकीट विक्री सुरु झाली. पण www.icccwc2011.kyazoonga.com या ऑफिशियल साईटवर उपलब्ध असलेल्या तिकीटांची कमीतकमी किंमत आहे. साडे 12 हजार रुपये नाहीतर, साडे 18 हजार रुपये. आयसीसीने ऑनलाईन तिकीट विक्रीसाठी बॅलट पद्धत सुरु केली. त्यामुळे एवढे पैसे खर्चून तिकीट घ्यायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. आणि तिकीटांची तुमची मागणी नोंदवावी लागेल. त्याची मुदत आहे पुढचे 7 दिवस. ही मुदत संपल्यावर लॉटरी काढण्यात येईल. आणि या लॉटरीत ज्यांची नावं येतील त्यांना पैसे भरुन तिकीट घरपोच मिळतील.स्पर्धेच्या सेमी फायनल मोहाली आणि कोलंबोत होणार आहेत. तर फायनल मॅच अर्थातच मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 01:43 PM IST

वर्ल्ड कप ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरूवात

01 मार्च

वर्ल्ड कप फायनलसाठी खुली तिकीट विक्री 11 मार्चपासून सुरु होत आहे. तर आजपासून ऑनलाईन तिकीट विक्री सुरु झाली. पण www.icccwc2011.kyazoonga.com या ऑफिशियल साईटवर उपलब्ध असलेल्या तिकीटांची कमीतकमी किंमत आहे. साडे 12 हजार रुपये नाहीतर, साडे 18 हजार रुपये. आयसीसीने ऑनलाईन तिकीट विक्रीसाठी बॅलट पद्धत सुरु केली. त्यामुळे एवढे पैसे खर्चून तिकीट घ्यायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. आणि तिकीटांची तुमची मागणी नोंदवावी लागेल. त्याची मुदत आहे पुढचे 7 दिवस. ही मुदत संपल्यावर लॉटरी काढण्यात येईल. आणि या लॉटरीत ज्यांची नावं येतील त्यांना पैसे भरुन तिकीट घरपोच मिळतील.स्पर्धेच्या सेमी फायनल मोहाली आणि कोलंबोत होणार आहेत. तर फायनल मॅच अर्थातच मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close