S M L

चंद्रपूरमध्ये तेल माफियांची -अधिकार्‍यांची अवैध युती !

प्रशांत कोरटकर, चंद्रपूर 01 मार्चमनमाडचं जळीतकांड झालं आणि राज्यातल्या तेल माफियांचा खरा चेहरा पुढे येऊ लागला. डिझेल आणि पेट्रोलचा काळा धंदा इतका मोठा आहे की यात तेल कंपन्यांचे अधिकारीही गुंतलेले आहेत. चंद्रपूर मध्ये पोलिसांनी घातलेल्या धाडीत तर इंडियन ऑईलच्या अधिकार्‍यांनाच अटक करण्यात आली. चंद्रपूरच्या परिसरात भरलेल्या टँकर मधून हजारो लिटर डिझेल चोरण्यात येते. आणि इतकी वर्ष हे चालले आहे ते इंडियन ऑईलच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने. या डिझेल टँकरमधून तेल माफिया रोज शेकडो लिटर डिझेल बाहेर नेऊन विकतात. अनेक टँकर्समध्ये खालच्या भागाला एक पाईप लावण्यात येतो आणि यातून टँकर रिकामा करताना चारशेच्या वर लिटर डिजल वेगळं केलं जायचं आणि ते बाहेर विकलं जाते. यापैकीचं डिझेल जातं चंद्रपूर वेस्टर्न कोल फिल्ड म्हणजेच डब्लू सी एल ला. डब्लू सी एल ला दर महिन्याला 80 टँकर्स डिझेलची गरज असते. याचाच फायदा घेत डब्लू सी एल आणि इंडियन ऑईलचे अधिकारी हजारो लिटरची चोरी करतात. अशी डिझेल चोरी इथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पोलिसांनी याबद्दल धाड टाकून इंडियन ऑईल चे डेप्युटी मॅनेजर अरविंद श्रीरामे, डब्लू सी एल चे डेप्युटी मॅनेजर अशोककुमार सिंग आणि सुनील चोपडे या ट्रान्सपोर्टरला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यात वेस्टर्न कोल फिल्डच्या 22 खाणी आहेत. आणि या खाणींच्या वाहनांसाठी लाखो लिटर डिझेल असं गायब होतं. या घटनेमुळे अधिकारी आणि तेल माफियांचं कसं साटलोट आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 03:37 PM IST

चंद्रपूरमध्ये तेल माफियांची -अधिकार्‍यांची अवैध युती !

प्रशांत कोरटकर, चंद्रपूर

01 मार्च

मनमाडचं जळीतकांड झालं आणि राज्यातल्या तेल माफियांचा खरा चेहरा पुढे येऊ लागला. डिझेल आणि पेट्रोलचा काळा धंदा इतका मोठा आहे की यात तेल कंपन्यांचे अधिकारीही गुंतलेले आहेत. चंद्रपूर मध्ये पोलिसांनी घातलेल्या धाडीत तर इंडियन ऑईलच्या अधिकार्‍यांनाच अटक करण्यात आली.

चंद्रपूरच्या परिसरात भरलेल्या टँकर मधून हजारो लिटर डिझेल चोरण्यात येते. आणि इतकी वर्ष हे चालले आहे ते इंडियन ऑईलच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने. या डिझेल टँकरमधून तेल माफिया रोज शेकडो लिटर डिझेल बाहेर नेऊन विकतात.

अनेक टँकर्समध्ये खालच्या भागाला एक पाईप लावण्यात येतो आणि यातून टँकर रिकामा करताना चारशेच्या वर लिटर डिजल वेगळं केलं जायचं आणि ते बाहेर विकलं जाते. यापैकीचं डिझेल जातं चंद्रपूर वेस्टर्न कोल फिल्ड म्हणजेच डब्लू सी एल ला. डब्लू सी एल ला दर महिन्याला 80 टँकर्स डिझेलची गरज असते. याचाच फायदा घेत डब्लू सी एल आणि इंडियन ऑईलचे अधिकारी हजारो लिटरची चोरी करतात. अशी डिझेल चोरी इथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

पोलिसांनी याबद्दल धाड टाकून इंडियन ऑईल चे डेप्युटी मॅनेजर अरविंद श्रीरामे, डब्लू सी एल चे डेप्युटी मॅनेजर अशोककुमार सिंग आणि सुनील चोपडे या ट्रान्सपोर्टरला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यात वेस्टर्न कोल फिल्डच्या 22 खाणी आहेत. आणि या खाणींच्या वाहनांसाठी लाखो लिटर डिझेल असं गायब होतं. या घटनेमुळे अधिकारी आणि तेल माफियांचं कसं साटलोट आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close