S M L

पुणे बंद प्रकरणी पोलिसांचा अर्ज कोर्टाने फेटाळला

01 मार्चशिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना जामीन मिळू नये म्हणून पोलिसांनी केलेला अर्ज कोर्टाने आज फेटाळून लावला आहे. शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंद प्रकरणी या दोघांचेही फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यामध्ये पुण्यात हिंसक आंदोलन करण्याचं या दोघांचं संभाषण पोलिसांनी टॅपिंग केलं होतं. त्यानंतर या दोघांनाही अटक होऊन जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी शिवाजीनगर कोर्टाने नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने घ्यायला पोलिसांना परवानगी दिली. याच प्रकरणात पुणे पोलिसांनी हा अर्ज केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 03:36 PM IST

पुणे बंद प्रकरणी पोलिसांचा अर्ज कोर्टाने फेटाळला

01 मार्च

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना जामीन मिळू नये म्हणून पोलिसांनी केलेला अर्ज कोर्टाने आज फेटाळून लावला आहे. शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंद प्रकरणी या दोघांचेही फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यामध्ये पुण्यात हिंसक आंदोलन करण्याचं या दोघांचं संभाषण पोलिसांनी टॅपिंग केलं होतं. त्यानंतर या दोघांनाही अटक होऊन जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी शिवाजीनगर कोर्टाने नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने घ्यायला पोलिसांना परवानगी दिली. याच प्रकरणात पुणे पोलिसांनी हा अर्ज केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close