S M L

मर्डर 2 मध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलीन

01 मार्चमल्लिका शेरावत एक अभिनेत्री म्हणून चर्चेत आली ती मर्डर सिनेमामुळे. भट कॅम्पचा हा थ्रिलर सिनेमा यापूर्वी अनेक कारणांनी गाजला. आता या सिनेमाचा दुसरा भाग येत आहे. मर्डर 2 यासाठी सिनेमातही काही बदल केले गेले आहे. भट कॅम्पचा मर्डर रिलीज झाला तो 2004मध्ये. अनुराग बासूचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमानं अनेकांना धक्का दिला होता तो त्यातल्या बोल्ड सिनमुळे मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी यांची केमिस्ट्री यातनं जरा जास्तच जुळलेली दिसली. अनु मलिकचं संगीतही सिनेमाप्रमाणेच सुपरडुपर हिट झालं होतं.आणि आता पुन्हा एकदा हा बोल्डनेस पडद्यावर दिसणार आहे मर्डर पार्ट 2 मधून. सिनेमा अर्थातच भट कॅम्पचाच आहे. पण मल्लिका शेरावतच्या जागी आता श्रीलंकन ब्युटी जॅकलीन दिसणार आहे. तिच्याबरोबर इम्रान हाश्मीच आहे. यावेळी सिनेमाचं दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहे. जॅकलीनच्या भूमिकेसाठी बिपाशा बासू, मल्लिका शेरावत, सोनल चौहान यांनाही विचारलं होतं. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे आता जॅकलीनवर मोठी जबाबदारी पडलीय मल्लिकाला काँपिटेशन देण्याची या नव्या मर्डरमध्ये इम्रान हाश्मी 6 पॅकमध्ये दिसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 05:30 PM IST

मर्डर 2 मध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलीन

01 मार्च

मल्लिका शेरावत एक अभिनेत्री म्हणून चर्चेत आली ती मर्डर सिनेमामुळे. भट कॅम्पचा हा थ्रिलर सिनेमा यापूर्वी अनेक कारणांनी गाजला. आता या सिनेमाचा दुसरा भाग येत आहे. मर्डर 2 यासाठी सिनेमातही काही बदल केले गेले आहे.

भट कॅम्पचा मर्डर रिलीज झाला तो 2004मध्ये. अनुराग बासूचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमानं अनेकांना धक्का दिला होता तो त्यातल्या बोल्ड सिनमुळे मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी यांची केमिस्ट्री यातनं जरा जास्तच जुळलेली दिसली. अनु मलिकचं संगीतही सिनेमाप्रमाणेच सुपरडुपर हिट झालं होतं.

आणि आता पुन्हा एकदा हा बोल्डनेस पडद्यावर दिसणार आहे मर्डर पार्ट 2 मधून. सिनेमा अर्थातच भट कॅम्पचाच आहे. पण मल्लिका शेरावतच्या जागी आता श्रीलंकन ब्युटी जॅकलीन दिसणार आहे. तिच्याबरोबर इम्रान हाश्मीच आहे. यावेळी सिनेमाचं दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहे. जॅकलीनच्या भूमिकेसाठी बिपाशा बासू, मल्लिका शेरावत, सोनल चौहान यांनाही विचारलं होतं. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे आता जॅकलीनवर मोठी जबाबदारी पडलीय मल्लिकाला काँपिटेशन देण्याची या नव्या मर्डरमध्ये इम्रान हाश्मी 6 पॅकमध्ये दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close