S M L

बोगस शाळेमुळे 10 वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान

02 मार्चशाळा बोगस असल्यानं त्या शाळेत शिकणार्‍या दहावीच्या 10 विद्यार्थ्यांना परीक्षेचं हॉल तिकीटच मिळालं नसल्याची घटना मुंबईतल्या भांडुपमध्ये घडली. मेरी ऍन इंग्लीश हायस्कुलने मान्यता काढल्यानंतरही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले. पण एका चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये भरणार्‍या शाळेला मान्यात दिली कुणी असा सवाल आता विचारला जात आहे.भांडुपच्या बैठ्या चाळीतल्या घरांमध्येच असलेली मेरी ऍन इंग्लीश हायस्कूल. याच शाळेत दहावीत शिकणार्‍या विशाल रावतचं एक वर्ष वाया गेलं कारण त्याला परीक्षेचं हॉल तिकीटच मिळालेलं नाही. मेरी ऍन इंग्लिश स्कूलची मान्यात काढल्यानंतरही शाळेनं विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. आणि 10 विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं. या शाळेत एकूण 35 विद्यार्थी आहेत. पण यातले 25 विद्यार्थीही बोगस असल्याचं उघड झालं आहे. शाळेनं मान्यता मिळण्यासाठीचे कोणतेच निकष पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळे शाळेची मान्यता रद्द झाली. अशा शाळांमध्ये प्रवेश घेताना पालकांनी योग्य चौकशी करणे गरजेचं आहे. पण अशाप्रकारे बोगस विद्यार्थ्यांची भरती करुन कुठल्या तरी चाळीतल्या खोल्यांमध्ये शाळा काढण्याची परवनागी मिळतेच कशी यावर शिक्षणअधिकारी मात्र बोलण्यास तयार नाहीत. तर ज्या 10 विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं त्यांच्या भवितव्याचं काय असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 01:33 PM IST

बोगस शाळेमुळे 10 वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान

02 मार्च

शाळा बोगस असल्यानं त्या शाळेत शिकणार्‍या दहावीच्या 10 विद्यार्थ्यांना परीक्षेचं हॉल तिकीटच मिळालं नसल्याची घटना मुंबईतल्या भांडुपमध्ये घडली. मेरी ऍन इंग्लीश हायस्कुलने मान्यता काढल्यानंतरही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले. पण एका चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये भरणार्‍या शाळेला मान्यात दिली कुणी असा सवाल आता विचारला जात आहे.

भांडुपच्या बैठ्या चाळीतल्या घरांमध्येच असलेली मेरी ऍन इंग्लीश हायस्कूल. याच शाळेत दहावीत शिकणार्‍या विशाल रावतचं एक वर्ष वाया गेलं कारण त्याला परीक्षेचं हॉल तिकीटच मिळालेलं नाही. मेरी ऍन इंग्लिश स्कूलची मान्यात काढल्यानंतरही शाळेनं विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. आणि 10 विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं.

या शाळेत एकूण 35 विद्यार्थी आहेत. पण यातले 25 विद्यार्थीही बोगस असल्याचं उघड झालं आहे. शाळेनं मान्यता मिळण्यासाठीचे कोणतेच निकष पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळे शाळेची मान्यता रद्द झाली. अशा शाळांमध्ये प्रवेश घेताना पालकांनी योग्य चौकशी करणे गरजेचं आहे. पण अशाप्रकारे बोगस विद्यार्थ्यांची भरती करुन कुठल्या तरी चाळीतल्या खोल्यांमध्ये शाळा काढण्याची परवनागी मिळतेच कशी यावर शिक्षणअधिकारी मात्र बोलण्यास तयार नाहीत. तर ज्या 10 विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं त्यांच्या भवितव्याचं काय असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close