S M L

मुंबईतील सामान्य क्रिकेटप्रेमीला कोटा सिस्टिमचा फटका

02 मार्चवर्ल्ड कप स्पर्धेची फायनल 2 एप्रिलला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सजलेल्या वानखेडे स्टेडियमवर मॅच पहाण्याची उत्सुकता मुंबईकरांमध्ये आहे. पण त्यांच्या हाती निराशा आलीय. कारण सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी केवळ 4 हजार तिकीट उपलब्ध आहेत. आणि त्यातही एक हजार तिकीट ऑनलाईन आहेत. पण ही तिकीट ही मुंबईकरांच्या खिशाला न परवडणारी आहेत. वर्ल्डकपचं क्रिकेट हे नक्की कुणासाठी असा खडा सवालचं आता क्रिकेटप्रेमी करत आहे.वानखेडे स्टेडियमला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. याच वानखेडे स्टेडियमवर 2 एप्रिलला वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. आणि यासाठीच 37 वर्षापूर्वी उभारण्यात आलेलं हे स्टेडियम पुन्हा नव्याने उभारण्यात आले आहे. त्यासाठी जवळजवळ 300 कोटी रूपयांचा खर्च आला आहे. इलेक्ट्रॉनीक स्कोअरबोर्ड आणि चार फ्लड लाईट्स या स्टेडियमचं आकर्षण असणार आहे. या नव्या स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी मुंबईकर उत्सुक आहेत. या स्टेडियमवर 13 मार्चला न्यूझीलंड आणि कॅनडादरम्यान पहिली मॅच रंगेल. तर पाचच दिवसांनी म्हणजे 18 मार्चला न्यूझीलंड आणि श्रीलंका या तगड्या टीम आमने सामने येतील. पण क्रिकेटपे्रमीं वाट पाहतायत ती 2 एप्रिलला वानखेडे मैदानावर होणार्‍या फायनलची.नव्यानं बांधण्यात आलेल्या या स्टेडियमची क्षमता आहे 31 हजार 500 पण यातली केवळ 4 हजार तिकीट सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी उपलब्ध आहेत आणि त्यातही 1 हजार तिकीटांची ऑनलाईन विक्री होणार आहे. खुल्या विक्रीतील 3000 हजार तिकीटांचे दर ऑनलाईन तिकीटांच्या तुलनेत कमी आहेत. नॉर्थ स्टॅण्डचं तिकीट एक हजार तीनशे रुपयात, दिवेचा स्टँण्डचं तीन हजार रुपयात तर इस्ट लोअर स्टँडचं तिकीट सात हजार रुपयात मिळणार आहे. येत्या 11 मार्चपासून या खुल्या तिकीट विक्रीला सुरूवात होणार आहे. उरलेली सर्व तिकीट म्हणजेच 27 हजार 500 तिकीट ही कोटा पध्दतीनं वाटली जाणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या 329 क्लब, तसेच जिमखाना आणि आयसीसीमध्ये ही तिकीटं वितरीत केली जाणार आहेत. त्यामुळे या कोटा सिसिस्टचा सामान्य क्रिकेटप्रेमींना मात्र फटका बसला आहे. क्रिकेट आणि त्यातही वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल क्रिकेटवेड्या मुंबईत होतेय म्हटल्यावर मुंबईत क्रिकेटचा फिव्हर सातवे आसमानपर आहे. पण मुंबईकरांच्या या उत्साहाला कोटा सिसिस्टचं ग्रहण लागले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नव्या वानखेडे स्टेडियममधून फायनलची मजा लुटण्याचं क्रिकेटप्रेमींचं स्वप्न या वर्ल्ड कप स्पर्धेत तरी पूर्ण होईल असं वाटत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 05:09 PM IST

मुंबईतील सामान्य क्रिकेटप्रेमीला कोटा सिस्टिमचा फटका

02 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल 2 एप्रिलला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सजलेल्या वानखेडे स्टेडियमवर मॅच पहाण्याची उत्सुकता मुंबईकरांमध्ये आहे. पण त्यांच्या हाती निराशा आलीय. कारण सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी केवळ 4 हजार तिकीट उपलब्ध आहेत. आणि त्यातही एक हजार तिकीट ऑनलाईन आहेत. पण ही तिकीट ही मुंबईकरांच्या खिशाला न परवडणारी आहेत. वर्ल्डकपचं क्रिकेट हे नक्की कुणासाठी असा खडा सवालचं आता क्रिकेटप्रेमी करत आहे.

वानखेडे स्टेडियमला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. याच वानखेडे स्टेडियमवर 2 एप्रिलला वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. आणि यासाठीच 37 वर्षापूर्वी उभारण्यात आलेलं हे स्टेडियम पुन्हा नव्याने उभारण्यात आले आहे. त्यासाठी जवळजवळ 300 कोटी रूपयांचा खर्च आला आहे. इलेक्ट्रॉनीक स्कोअरबोर्ड आणि चार फ्लड लाईट्स या स्टेडियमचं आकर्षण असणार आहे.

या नव्या स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी मुंबईकर उत्सुक आहेत. या स्टेडियमवर 13 मार्चला न्यूझीलंड आणि कॅनडादरम्यान पहिली मॅच रंगेल. तर पाचच दिवसांनी म्हणजे 18 मार्चला न्यूझीलंड आणि श्रीलंका या तगड्या टीम आमने सामने येतील. पण क्रिकेटपे्रमीं वाट पाहतायत ती 2 एप्रिलला वानखेडे मैदानावर होणार्‍या फायनलची.

नव्यानं बांधण्यात आलेल्या या स्टेडियमची क्षमता आहे 31 हजार 500 पण यातली केवळ 4 हजार तिकीट सामान्य क्रिकेटप्रेमींसाठी उपलब्ध आहेत आणि त्यातही 1 हजार तिकीटांची ऑनलाईन विक्री होणार आहे. खुल्या विक्रीतील 3000 हजार तिकीटांचे दर ऑनलाईन तिकीटांच्या तुलनेत कमी आहेत. नॉर्थ स्टॅण्डचं तिकीट एक हजार तीनशे रुपयात, दिवेचा स्टँण्डचं तीन हजार रुपयात तर इस्ट लोअर स्टँडचं तिकीट सात हजार रुपयात मिळणार आहे. येत्या 11 मार्चपासून या खुल्या तिकीट विक्रीला सुरूवात होणार आहे.

उरलेली सर्व तिकीट म्हणजेच 27 हजार 500 तिकीट ही कोटा पध्दतीनं वाटली जाणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या 329 क्लब, तसेच जिमखाना आणि आयसीसीमध्ये ही तिकीटं वितरीत केली जाणार आहेत. त्यामुळे या कोटा सिसिस्टचा सामान्य क्रिकेटप्रेमींना मात्र फटका बसला आहे. क्रिकेट आणि त्यातही वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल क्रिकेटवेड्या मुंबईत होतेय म्हटल्यावर मुंबईत क्रिकेटचा फिव्हर सातवे आसमानपर आहे. पण मुंबईकरांच्या या उत्साहाला कोटा सिसिस्टचं ग्रहण लागले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नव्या वानखेडे स्टेडियममधून फायनलची मजा लुटण्याचं क्रिकेटप्रेमींचं स्वप्न या वर्ल्ड कप स्पर्धेत तरी पूर्ण होईल असं वाटत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close