S M L

राष्ट्रवादीचे मुंबई जिल्हा संघटनेत बदलाचे संकेत

02 मार्च आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका ध्यानात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई जिल्हा संघटनेत महत्वाचे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादीशी संबंधित पदाधिकार्‍यांची आणि नेत्यांची एक बैठक घेतली. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसंच जिल्हा संघटनेतल्या पदाधिकार्‍यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार वर्मा यांच्याकडून काढून घेण्यात आले. यापुढे पक्षाच्या मुंबईतील आठही आमदार आणि एका खासदाराला पक्षसंघटनेत लक्ष घालण्याची तंबी पवारांनी दिली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने मराठी चेहरा आणण्याचा पक्षाचा मानस आहे, असं संकेत पक्षश्रेष्ठींनी यावेळी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 05:15 PM IST

राष्ट्रवादीचे मुंबई जिल्हा संघटनेत बदलाचे संकेत

02 मार्च

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका ध्यानात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई जिल्हा संघटनेत महत्वाचे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादीशी संबंधित पदाधिकार्‍यांची आणि नेत्यांची एक बैठक घेतली. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसंच जिल्हा संघटनेतल्या पदाधिकार्‍यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार वर्मा यांच्याकडून काढून घेण्यात आले. यापुढे पक्षाच्या मुंबईतील आठही आमदार आणि एका खासदाराला पक्षसंघटनेत लक्ष घालण्याची तंबी पवारांनी दिली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने मराठी चेहरा आणण्याचा पक्षाचा मानस आहे, असं संकेत पक्षश्रेष्ठींनी यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close