S M L

पुण्यात सेना भाजपमध्ये उभी फूट !

03 मार्च पुण्यामध्ये सेना भाजप या मित्र पक्षातलं वैर वाढत चाललं आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सेना भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. पाच मार्चला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. खरं तर या निवडणुकीच्यावेळी शिवसेनेला उमेदवारी मिळण्याची बोलणी मित्रपक्षात आधी झाली होती. पण शिवसेनेला विश्वासात न घेता, चर्चा न करता भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला. या सगळ्या प्रकारामुळे सूचक -अनुमोदक न मिळाल्यामुळे शिवसेनेला आपला उमेदवार उभा करता आला नाही. यावर नाराजी व्यक्त करुन शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची माहिती दिली. स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यापैकी सेना-भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसचे 5 आणि मनसेचा एक नगरसेवक आहे. आता शिवसेनेची दोन मतं गळाल्यामुळे भाजपकडे 3 चं मत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या निर्णयाचा फटका भाजपलाही बसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 03:49 PM IST

पुण्यात सेना भाजपमध्ये उभी फूट !

03 मार्च

पुण्यामध्ये सेना भाजप या मित्र पक्षातलं वैर वाढत चाललं आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सेना भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. पाच मार्चला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. खरं तर या निवडणुकीच्यावेळी शिवसेनेला उमेदवारी मिळण्याची बोलणी मित्रपक्षात आधी झाली होती. पण शिवसेनेला विश्वासात न घेता, चर्चा न करता भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला. या सगळ्या प्रकारामुळे सूचक -अनुमोदक न मिळाल्यामुळे शिवसेनेला आपला उमेदवार उभा करता आला नाही. यावर नाराजी व्यक्त करुन शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची माहिती दिली. स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. यापैकी सेना-भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसचे 5 आणि मनसेचा एक नगरसेवक आहे. आता शिवसेनेची दोन मतं गळाल्यामुळे भाजपकडे 3 चं मत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या निर्णयाचा फटका भाजपलाही बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close