S M L

पुण्यात शाळेकडून दहावीचा पेपर गहाळ

03 मार्चपुण्यातल्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत शिकणार्‍या एक विद्यार्थीनीचा दहावीचा पेपरच गहाळ होण्याचा प्रकार शाळेकडून घडला आहे. मात्र तिच्याकडून जबरदस्तीने ही परीक्षाच दिली नसल्याचं पत्र लिहुन घेतलं असल्याचं या विद्यार्थीनीचं म्हणणं आहे. याविरोधात आज पुण्यामध्ये भारतीय विद्यार्थी संघटनेतर्फे एसएससी बोर्डासमोर आंदोलन केलं. दहावीचा पहिला मराठीचा पेपर 1 तारखेला झाला. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत हा पेपर देणार्‍या सायली पाटील या विद्यार्थीनीने पेपर दिला आणि ती घरी गेली. मात्र नंतर या शाळेतुन तिला फोन आला. त्यानंतर हा पेपर विद्यार्थीनीनेच गहाळ केला आहे असं तिच्याकडून लिहुन घेण्यात आलं असा आरोप या विद्यार्थीनीने केला आहे. या आंदोलनानंतर या प्रकरणाची चौकशी करु असं एसएससी बोर्डातर्फे सांगण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 05:12 PM IST

पुण्यात शाळेकडून दहावीचा पेपर गहाळ

03 मार्च

पुण्यातल्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत शिकणार्‍या एक विद्यार्थीनीचा दहावीचा पेपरच गहाळ होण्याचा प्रकार शाळेकडून घडला आहे. मात्र तिच्याकडून जबरदस्तीने ही परीक्षाच दिली नसल्याचं पत्र लिहुन घेतलं असल्याचं या विद्यार्थीनीचं म्हणणं आहे. याविरोधात आज पुण्यामध्ये भारतीय विद्यार्थी संघटनेतर्फे एसएससी बोर्डासमोर आंदोलन केलं. दहावीचा पहिला मराठीचा पेपर 1 तारखेला झाला. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत हा पेपर देणार्‍या सायली पाटील या विद्यार्थीनीने पेपर दिला आणि ती घरी गेली. मात्र नंतर या शाळेतुन तिला फोन आला. त्यानंतर हा पेपर विद्यार्थीनीनेच गहाळ केला आहे असं तिच्याकडून लिहुन घेण्यात आलं असा आरोप या विद्यार्थीनीने केला आहे. या आंदोलनानंतर या प्रकरणाची चौकशी करु असं एसएससी बोर्डातर्फे सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close