S M L

मतीमंद मुलींवर लैंगिक शोषणाची तक्रार ;गुन्हा दाखल

04 मार्चपनवेलमधल्या कल्याणी महिला आणि बाल सेवा संस्थेमध्ये पाच मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चाईल्ड प्रोटेक्शन कमिटीतर्फे सर्वात पहिल्यांदा करण्यात आलेल्या चौकशीनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या कमिटीने सरकारला अधिक चौकशी करण्याची विनंती केली. त्यानुसार बालकल्याण समितीतर्फे कल्याणी संस्थेतील मुलींची चौकशी करण्यात आली. आणि तिथेचं मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं उघड झालं. त्यानंतर तातडीने नवी मुंबईतील पोलीस आयुक्तांकडे याबाबतची तक्रार करण्यात आली. आणि तपासाने वेग घेतला. या संस्थेमधल्या सर्व मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्याचा अहवाल पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आला आहेत. त्यामध्ये मुलींच्या सुरक्षेबद्दल आणि आरोग्याबद्दल गंभीर प्रश्नचिन्हं उपस्थित झाले. या संस्थेच्या नोंदणीचा कालखंड, सरकारने थांबवलेलं अनुदान या सगळ्यामध्ये गोंधळ असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे संस्थेतल्या मुलींना तातडीने कर्जतमधल्या मतीमंद मुलींच्या शासकीय केंद्रामध्ये हलवण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2011 09:13 AM IST

मतीमंद मुलींवर लैंगिक शोषणाची तक्रार ;गुन्हा दाखल

04 मार्च

पनवेलमधल्या कल्याणी महिला आणि बाल सेवा संस्थेमध्ये पाच मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चाईल्ड प्रोटेक्शन कमिटीतर्फे सर्वात पहिल्यांदा करण्यात आलेल्या चौकशीनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर या कमिटीने सरकारला अधिक चौकशी करण्याची विनंती केली. त्यानुसार बालकल्याण समितीतर्फे कल्याणी संस्थेतील मुलींची चौकशी करण्यात आली. आणि तिथेचं मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं उघड झालं. त्यानंतर तातडीने नवी मुंबईतील पोलीस आयुक्तांकडे याबाबतची तक्रार करण्यात आली. आणि तपासाने वेग घेतला.

या संस्थेमधल्या सर्व मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्याचा अहवाल पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आला आहेत. त्यामध्ये मुलींच्या सुरक्षेबद्दल आणि आरोग्याबद्दल गंभीर प्रश्नचिन्हं उपस्थित झाले. या संस्थेच्या नोंदणीचा कालखंड, सरकारने थांबवलेलं अनुदान या सगळ्यामध्ये गोंधळ असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे संस्थेतल्या मुलींना तातडीने कर्जतमधल्या मतीमंद मुलींच्या शासकीय केंद्रामध्ये हलवण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2011 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close