S M L

पोलिसांच्या साक्षीनं पालकच पुरवतात मुलांना कॉपींचे गठ्ठे

04 मार्चकॉपीमुक्त परीक्षांचा डांगोरा शासनातर्फे पिटला जात असला तरी मास कॉपीचे प्रकार सगळीकडे सर्रास सुरू आहेत. काल दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. इंग्रजी सारख्या विषयासाठी कॉपी बहाद्दरांचा महत्त्वाचा दिवस. धुळे शहरातील कन्या विद्यालय येथे इंग्रजीचा पेपर सुरू होता. तर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकच्या पुस्तक कॉपी पुरवली गेली ती त्यांच्या पालकांकडून आणि या सगळ्याला अटकाव करण्याऐवजी हे खुलेआम झालं ते बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या साक्षीनेच. शाळेशेजारच्या घरांच्या कौलांवर चढून, सायकल स्टॅण्डमधल्या सायकल्सवर चढून वर्गातल्या विद्यार्थ्यांनी चक्क चिठ्ठया आणि पुस्तक पुरवली गेली आणि एक-दोन नाही तर मदत करणारे असे अनेकजण होते. परिसरात उभ्या असलेल्या पोलीस हवालदाराला न जुमानता ही कॉपी धुळ्यातल्या या कन्या विद्यालयात सुरू होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2011 10:27 AM IST

पोलिसांच्या साक्षीनं पालकच पुरवतात मुलांना कॉपींचे गठ्ठे

04 मार्च

कॉपीमुक्त परीक्षांचा डांगोरा शासनातर्फे पिटला जात असला तरी मास कॉपीचे प्रकार सगळीकडे सर्रास सुरू आहेत. काल दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. इंग्रजी सारख्या विषयासाठी कॉपी बहाद्दरांचा महत्त्वाचा दिवस. धुळे शहरातील कन्या विद्यालय येथे इंग्रजीचा पेपर सुरू होता. तर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकच्या पुस्तक कॉपी पुरवली गेली ती त्यांच्या पालकांकडून आणि या सगळ्याला अटकाव करण्याऐवजी हे खुलेआम झालं ते बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या साक्षीनेच. शाळेशेजारच्या घरांच्या कौलांवर चढून, सायकल स्टॅण्डमधल्या सायकल्सवर चढून वर्गातल्या विद्यार्थ्यांनी चक्क चिठ्ठया आणि पुस्तक पुरवली गेली आणि एक-दोन नाही तर मदत करणारे असे अनेकजण होते. परिसरात उभ्या असलेल्या पोलीस हवालदाराला न जुमानता ही कॉपी धुळ्यातल्या या कन्या विद्यालयात सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2011 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close