S M L

राज्याचा 'अर्थ' संकल्प निधी खर्चाविना पडून !

आशिष जाधव, मुंबई04 मार्चराज्याच्या गेल्या अर्थसंकल्पाचा निधी 31 मार्चपर्यंत खर्च केला नाही तर संबंधित विभागाचा निधी बाद होतो. पण मार्च महिना उजाडला तरी अर्थसंकल्पातला निम्मा निधी खर्चाविना पडून आहे. राज्याच्या 2010-11 या आर्थिक वर्षासाठी दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आली होती. तसेच पुरवण्या मागण्यांद्वारेही अर्थसंकल्पीय तरतूदींमध्ये वाढ करण्यात आली. पण आयबीएन-लोकमतकडे असलेल्या आकडेवारीनुसार या ना त्या कारणामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 58 टक्के म्हणजेच 90 हजार 300 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय निधी खर्चा झाला. याचाच अर्थ सर्व खात्यांचा मिळून सुमारे 87 हजार कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारीअखेरपर्यंत पडून होता. त्यामुळेच सध्या संबंधित विभागांनी जारी केलेला निधी कसा खर्च केला आणि करावा याचा आढावा घेण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहे.गेल्या अर्थसंकल्पातल्या विभागवार तरतुदींचा जर विचार केला तर सर्वात कमी खर्च मुख्यमंत्र्यांकडल्या गृहनिर्माण खात्यानं केला. या खात्याचा फेब्रुवारीपर्यंत 25 टक्केच निधी खर्च झाला. त्यानंतर 50 टक्क्यांहून कमी खर्च करणार्‍या खात्यांमध्ये पर्यटन विकास (44 टक्के), नियोजन (47 टक्के) आणि अल्पसंख्याक विकास (48 टक्के) या खात्यांच्या क्रमांक लागतोय. पण आरोग्य (98 टक्के), तंत्रशिक्षण (97 टक्के) आणि शालेय शिक्षण (91 टक्के), अन्न व नागरी पुरवठा (93 टक्के) आणि जलसंपदा (93 टक्के) या खात्यांनी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यातही काँग्रेसपेक्षा राष्ट्रावादीकडील खात्यांनी सरासरी जास्त खर्च केला. सध्या सर्व विभागांची चालू वर्षांतल्या निधीचा खर्च दाखवण्याची घाई सुरू आहे. पण तरीही बहुतांशी योजना आणि प्रकल्प अर्धवट आहेत अशी बोंब आहे.राज्याचा 'अर्थ' संकल्प निधी - 90 हजार 300 कोटी रुपये- 87 हजार कोटी - गृहनिर्माण- 25 टक्के- पर्यटन विकास-44 टक्के- नियोजन -47 टक्के- अल्पसंख्याक विकास-48 टक्के- आरोग्य-98 टक्के- तंत्रशिक्षण- 97 टक्के - शालेय शिक्षण-91 टक्के- अन्न व नागरी पुरवठा- 93 टक्के- जलसंपदा- 93 टक्के

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2011 04:21 PM IST

राज्याचा 'अर्थ' संकल्प निधी खर्चाविना पडून  !

आशिष जाधव, मुंबई

04 मार्च

राज्याच्या गेल्या अर्थसंकल्पाचा निधी 31 मार्चपर्यंत खर्च केला नाही तर संबंधित विभागाचा निधी बाद होतो. पण मार्च महिना उजाडला तरी अर्थसंकल्पातला निम्मा निधी खर्चाविना पडून आहे. राज्याच्या 2010-11 या आर्थिक वर्षासाठी दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आली होती. तसेच पुरवण्या मागण्यांद्वारेही अर्थसंकल्पीय तरतूदींमध्ये वाढ करण्यात आली. पण आयबीएन-लोकमतकडे असलेल्या आकडेवारीनुसार या ना त्या कारणामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 58 टक्के म्हणजेच 90 हजार 300 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय निधी खर्चा झाला. याचाच अर्थ सर्व खात्यांचा मिळून सुमारे 87 हजार कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारीअखेरपर्यंत पडून होता. त्यामुळेच सध्या संबंधित विभागांनी जारी केलेला निधी कसा खर्च केला आणि करावा याचा आढावा घेण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहे.

गेल्या अर्थसंकल्पातल्या विभागवार तरतुदींचा जर विचार केला तर सर्वात कमी खर्च मुख्यमंत्र्यांकडल्या गृहनिर्माण खात्यानं केला. या खात्याचा फेब्रुवारीपर्यंत 25 टक्केच निधी खर्च झाला. त्यानंतर 50 टक्क्यांहून कमी खर्च करणार्‍या खात्यांमध्ये पर्यटन विकास (44 टक्के), नियोजन (47 टक्के) आणि अल्पसंख्याक विकास (48 टक्के) या खात्यांच्या क्रमांक लागतोय. पण आरोग्य (98 टक्के), तंत्रशिक्षण (97 टक्के) आणि शालेय शिक्षण (91 टक्के), अन्न व नागरी पुरवठा (93 टक्के) आणि जलसंपदा (93 टक्के) या खात्यांनी सर्वाधिक खर्च केला आहे. त्यातही काँग्रेसपेक्षा राष्ट्रावादीकडील खात्यांनी सरासरी जास्त खर्च केला.

सध्या सर्व विभागांची चालू वर्षांतल्या निधीचा खर्च दाखवण्याची घाई सुरू आहे. पण तरीही बहुतांशी योजना आणि प्रकल्प अर्धवट आहेत अशी बोंब आहे.

राज्याचा 'अर्थ' संकल्प निधी

- 90 हजार 300 कोटी रुपये- 87 हजार कोटी

- गृहनिर्माण- 25 टक्के- पर्यटन विकास-44 टक्के- नियोजन -47 टक्के- अल्पसंख्याक विकास-48 टक्के- आरोग्य-98 टक्के- तंत्रशिक्षण- 97 टक्के - शालेय शिक्षण-91 टक्के- अन्न व नागरी पुरवठा- 93 टक्के- जलसंपदा- 93 टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2011 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close