S M L

म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरीची जाहिरात लांबणीवर

04 मार्चम्हाडाच्या स्वस्त घरांच्या माध्यमातून मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. पण या महिन्यात म्हाडाच्या घरांसाठी अपेक्षित असलेली लॉटरीची जाहिरात लांबणीवर पडली आहे. म्हाडा यावर्षी चार हजार चौतीस घरांसाठी अर्ज मार्ग मागवणार आहे. लॉॅटरीसाठी उपलब्ध असणार्‍या घरांपैकी फक्त नऊशे घरं बांधुन तयार आहेत. उर्वरीत घरं लॉटरीच्या निकालापर्यंत बांधुन तयार होतील का ? तसेच अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध होणार्‍या घरांच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणार्‍या नसल्यामुळे या जाहिरातीबाबत म्हाडा पुन्हा नव्याने विचार करत आहे. यासर्व घोळामुळे ही ऑनलाईन लॉटरी आता लांबली आहे. पण मग ही जाहिरात नेमकी कधी येणार हे खुद्द गृहनिर्माण राज्यमंत्रीही सांगू शकलेले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2011 05:06 PM IST

म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरीची जाहिरात लांबणीवर

04 मार्च

म्हाडाच्या स्वस्त घरांच्या माध्यमातून मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. पण या महिन्यात म्हाडाच्या घरांसाठी अपेक्षित असलेली लॉटरीची जाहिरात लांबणीवर पडली आहे. म्हाडा यावर्षी चार हजार चौतीस घरांसाठी अर्ज मार्ग मागवणार आहे. लॉॅटरीसाठी उपलब्ध असणार्‍या घरांपैकी फक्त नऊशे घरं बांधुन तयार आहेत. उर्वरीत घरं लॉटरीच्या निकालापर्यंत बांधुन तयार होतील का ? तसेच अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध होणार्‍या घरांच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणार्‍या नसल्यामुळे या जाहिरातीबाबत म्हाडा पुन्हा नव्याने विचार करत आहे. यासर्व घोळामुळे ही ऑनलाईन लॉटरी आता लांबली आहे. पण मग ही जाहिरात नेमकी कधी येणार हे खुद्द गृहनिर्माण राज्यमंत्रीही सांगू शकलेले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2011 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close