S M L

पुण्यात स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बीडकर विजयी

05 मार्चपुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे गणेश बीडकर यांची बहुमताने निवड झाली. या निवडीनंतर पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे असा नवीन पॅटर्न तयार झाला आहे. केवळ काँग्रेसच्या सुरेश कलमाडींना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला आपली पाचही मतं दिली. तर मनसेंसुद्धा भाजपला मदत करुन हा नवीन पॅटर्न उभा केला या निवडीसाठी 16 सदस्यांचं मतदान होणार होतं त्यापैकी पाच राष्ट्रवादी, 5 काँग्रेस, 3 भाजप आणि 2 शिवसेना तर 1 मनसे अशी मतांची संख्या होती. त्यातले राष्ट्रवादीचे 5 आणि मनसेचं 1 मत मिळवून भाजपने आपला उमेदवार निवडून आणला. तर काँग्रेसतर्फे शंकर पवार आणि राष्ट्रवादीतर्फे श्रीकांत पाटील उमेदवार होते. सगळ्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शेवटी भाजपसोबत जाऊन सुरेश कलमाडीना शह दिला हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का देऊन पुण्यात नवीन पॅटर्न तयार केला आणि एका दगडात 2 पक्षी मारले. शिवसेना तटस्थ राहिली होती मात्र सेनेने भाजपच्या या पवित्र्यावर नाराजी व्यक्त करुन युतीत असं करायला नको होतं अशी प्रतिक्रिया दिली. तिकडे काँग्रेसनेही राष्ट्रवादीनं आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेस - राष्ट्रवादीतली दरी वाढली तर दुसरीकडे आघाडीतही बिघाडीची सुरुवात झाल्याचं दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2011 12:20 PM IST

पुण्यात स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बीडकर विजयी

05 मार्चपुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे गणेश बीडकर यांची बहुमताने निवड झाली. या निवडीनंतर पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे असा नवीन पॅटर्न तयार झाला आहे. केवळ काँग्रेसच्या सुरेश कलमाडींना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला आपली पाचही मतं दिली. तर मनसेंसुद्धा भाजपला मदत करुन हा नवीन पॅटर्न उभा केला या निवडीसाठी 16 सदस्यांचं मतदान होणार होतं त्यापैकी पाच राष्ट्रवादी, 5 काँग्रेस, 3 भाजप आणि 2 शिवसेना तर 1 मनसे अशी मतांची संख्या होती. त्यातले राष्ट्रवादीचे 5 आणि मनसेचं 1 मत मिळवून भाजपने आपला उमेदवार निवडून आणला. तर काँग्रेसतर्फे शंकर पवार आणि राष्ट्रवादीतर्फे श्रीकांत पाटील उमेदवार होते. सगळ्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शेवटी भाजपसोबत जाऊन सुरेश कलमाडीना शह दिला हे स्पष्ट आहे.

राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का देऊन पुण्यात नवीन पॅटर्न तयार केला आणि एका दगडात 2 पक्षी मारले. शिवसेना तटस्थ राहिली होती मात्र सेनेने भाजपच्या या पवित्र्यावर नाराजी व्यक्त करुन युतीत असं करायला नको होतं अशी प्रतिक्रिया दिली. तिकडे काँग्रेसनेही राष्ट्रवादीनं आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेस - राष्ट्रवादीतली दरी वाढली तर दुसरीकडे आघाडीतही बिघाडीची सुरुवात झाल्याचं दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2011 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close