S M L

नागपूर टेस्टचा पहिला दिवस सचिननं गाजवला

6 नोव्हेंबर, नागपूरऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपुर टेस्टचा आजचा पहिला दिवस सचिन तेंडुलकरनं गाजवलाय. सचिनच्या सेंच्युरीच्या जोरावर दिवसाअखेर भारताने 5 विकेट गमावत 311 रन्स केले. मॅचच्या सुरूवातीला धोणीच्या नशिबानं त्याला टॉसमध्ये चांगली साथ दिली आणि बॅटींगला साथ देणार्‍या पिचवर सेहवाग आणि नवख्या विजयनं भारताला चांगली सुरूवात करून दिली. सेहवाग विशेषतः फटकेबाजीच्या मुडमध्ये दिसत होता. वॉटसननं ऑस्ट्रेलियाला पहिली विकेट मिळवून दिली आणि पदार्पाणातच 33 रन्स करणार्‍या विजयची इनिंग संपुष्टात आली. मॅचमध्ये क्रेझानं दोन झटपट विकेट काढल्या. पहिली विकेट द्रविडची. त्याची खराब कामगिरी या मॅचमध्येही सुरूच राहिली. तो शून्यावर आऊट झाला.सेहवागनं अतिशय आक्रमक पद्धतीनं 66 रन्सची खेळी केली पण एका चुकीच्या शॉटवर त्याची इनिंग संपुष्टात आली. पुन्हा क्रेझानंच विकेट घेतली. भारतीय बॅटींग ऑर्डर सांभाळण्याची जबाबदारी तेंडुलकरवर होती आणि त्यानं लक्ष्मणच्या साथीनं भारताचा खेळ सावरला. चहापानापर्यंत भारताचा स्कोर 202 ला 3 विकेट होता. तेंडुलकर 80 वर असताना क्रेझाच्या बॉलिंगवर जॉन्सननं त्याचा कॅच सोडला आणि सचिनला जीवदान मिळालं.लक्ष्मणनं अतिशय शांतपणे खेळत त्याची टेस्टमधली 37वी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. पण क्रेझाच्या एका अप्रतिम बॉलवर 146 रन्सची पार्टनरशिप संपुष्टात आली. पुन्हा एकदा तेंडुलकरला जीवदान मिळालं. पुन्हा क्रेझा दुदैर्वी बॉलर ठरला. सचिननं त्याची 40वी टेस्ट सेंच्युरी पूर्ण केली आणि त्यानं सुटकेचा निःश्वास टाकला. दुसर्‍या नवीन बॉलनं जॉन्सननं अखेर मास्टर ब्लास्टरची विकेट काढली. 109 रन्सवर त्याला एलबीडब्लू केलं. गांगुली आणि धोणी यांनी मग सूत्रं हाती घेतली. दिवसाअखेर भारताचा स्कोर 311 रन्सवर 5 विकेट होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2008 03:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2008 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close