S M L

बेहरामपाड्यात साडेआठ हजार झोपड्या जळून खाक

05 मार्चवांद्र्याच्या बेहरामपाड्यात लागलेली भीषण आग विझवण्यात यश आलं असलं तरी तिथल्या आठ ते साडेआठ हजार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीमागचं नेमकं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. तब्बल तीन तासानंतर ही आग विझवण्यात फायर ब्रिगेडच्या 26 इंजिनांना यश आलं. फायर ब्रिगेडची 26 इंजिन आणि 12 जंबो वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आली.या आगीच्या ज्वाळा थेट स्कायवॉकपर्यंत पोचल्या होत्या. तर बांद्रा स्टेशनवरच्या हार्बर लाईनवरचा फूट ओव्हर ब्रीज या आगीमुळे कोसळला. आगीत 21जण जखमी झाले आहेत. त्यांना बांद्र्याच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या 4 जवानांचाही समावेश आहे. त्यापैकी दोघांना ऍडमिट करण्यात आलं आहे. 2009 मध्ये बेहरामपाड्यात याच ठिकाणी प्रचंड मोठी आग लागली होती. ही आग विझवायला फायर ब्रिगेडला तब्बल 48 तास लागले होते.या ठिकाणी आता अनेक राजकीय नेते आणि अधिकारी भेट देत आहेत. दरम्यान उद्योगमंत्री नारायण राणे आणि राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली.आगीतील बाधित कुटुंबीयांना तातडीची 5 हजाराची मदत बांद्रा इथल्या आगीतील बाधित कुटुंबीयाना तातडीची मदत म्हणून 5 हजार रूपये देण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक माणसाला 1 हजार रूपये मदत देण्याची घोषणा मुंबई उपनगराचे पालकमंत्री नसीम खान यांनी केली. तसेच या लोकांना आजूबाजूच्या महानगरपालिका शाळांमध्ये हलवण्यात येणार आहे असं गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी सांगितले. या लोकांचं पुनर्वसन याच ठिकाणी करायचं का त्यांना दुसरीकडे हलवायचं याबद्दलही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.महापौरांची भेट मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव यांनी आज वांद्रे इथे आग लागलेल्या ठिकाणाला भेट दिली. यावेळी त्यांनी इथल्या नागरिकांशीही चर्चा केली. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. आगीमागच्या कारणाचा शोध घेणं गरजेचं आहे असंही त्या म्हणाल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2011 12:43 PM IST

बेहरामपाड्यात साडेआठ हजार झोपड्या जळून खाक

05 मार्च

वांद्र्याच्या बेहरामपाड्यात लागलेली भीषण आग विझवण्यात यश आलं असलं तरी तिथल्या आठ ते साडेआठ हजार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीमागचं नेमकं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. तब्बल तीन तासानंतर ही आग विझवण्यात फायर ब्रिगेडच्या 26 इंजिनांना यश आलं. फायर ब्रिगेडची 26 इंजिन आणि 12 जंबो वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आली.

या आगीच्या ज्वाळा थेट स्कायवॉकपर्यंत पोचल्या होत्या. तर बांद्रा स्टेशनवरच्या हार्बर लाईनवरचा फूट ओव्हर ब्रीज या आगीमुळे कोसळला. आगीत 21जण जखमी झाले आहेत. त्यांना बांद्र्याच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या 4 जवानांचाही समावेश आहे. त्यापैकी दोघांना ऍडमिट करण्यात आलं आहे.

2009 मध्ये बेहरामपाड्यात याच ठिकाणी प्रचंड मोठी आग लागली होती. ही आग विझवायला फायर ब्रिगेडला तब्बल 48 तास लागले होते.या ठिकाणी आता अनेक राजकीय नेते आणि अधिकारी भेट देत आहेत. दरम्यान उद्योगमंत्री नारायण राणे आणि राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली.

आगीतील बाधित कुटुंबीयांना तातडीची 5 हजाराची मदत

बांद्रा इथल्या आगीतील बाधित कुटुंबीयाना तातडीची मदत म्हणून 5 हजार रूपये देण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक माणसाला 1 हजार रूपये मदत देण्याची घोषणा मुंबई उपनगराचे पालकमंत्री नसीम खान यांनी केली. तसेच या लोकांना आजूबाजूच्या महानगरपालिका शाळांमध्ये हलवण्यात येणार आहे असं गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी सांगितले. या लोकांचं पुनर्वसन याच ठिकाणी करायचं का त्यांना दुसरीकडे हलवायचं याबद्दलही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

महापौरांची भेट

मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव यांनी आज वांद्रे इथे आग लागलेल्या ठिकाणाला भेट दिली. यावेळी त्यांनी इथल्या नागरिकांशीही चर्चा केली. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. आगीमागच्या कारणाचा शोध घेणं गरजेचं आहे असंही त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2011 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close