S M L

आयबीएन लोकमतला मटा सन्मान पुरस्काराची 10 मानांकनं

05 मार्चदरवर्षी देण्यात येणार्‍या म.टा.सन्मान 2011 च्या नामांकनाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. अंधेरी येथे म.टा. सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठी न्यूज चॅनलमध्ये मानाचं स्थान मिळवलेल्या आयबीएन लोकमतला यावर्षी 10 मानांकनं मिळाली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट कथाबाह्य टीव्ही मालिकेचा बहुमान मिळाला तो आयबीएन लोकमतच्या लोकप्रिय कार्यक्रम गर्जा महाराष्ट्रला आणि मराठीतील पहिला आधुनिक आणि इलेक्ट्रानिक जगाची सफर घडवून आणणारा टेक गुरू या कार्यक्रमालाही मानांकन मिळालं आहे तसेच मनोरंजन क्षेत्रावर आधारित शोटाईम या कार्यक्रमाचा ही सहभाग आहे, सर्वोकृष्ट पुरुष सूत्रधार पुरस्कारासाठी अमोल परचुरे यांना गर्जा महाराष्ट्रसाठी तर सुहास घटवई यांना 'किल्ले शिवाजी'साठी मानांकन मिळाली आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट वृत्तविषयक पुरुष सूत्रधार यामध्ये विनायक गायकवाड यांना तर स्त्री सर्वोत्कृष्ट सूत्रधार म्हणून आरती कुलकर्णी आणि रेणुका रामचंद्रन यांना मानांकन मिळाली आहेत आणि सर्वोत्कृष्ट टीव्ही वृत्तविषयक मालिका म्हणून 'खेळ मांडियेला'साठी मानांकन मिळालं आहे.

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2014 03:50 PM IST

आयबीएन लोकमतला मटा सन्मान पुरस्काराची 10 मानांकनं

05 मार्च

दरवर्षी देण्यात येणार्‍या म.टा.सन्मान 2011 च्या नामांकनाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. अंधेरी येथे म.टा. सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठी न्यूज चॅनलमध्ये मानाचं स्थान मिळवलेल्या आयबीएन लोकमतला यावर्षी 10 मानांकनं मिळाली आहे.

यामध्ये सर्वोत्कृष्ट कथाबाह्य टीव्ही मालिकेचा बहुमान मिळाला तो आयबीएन लोकमतच्या लोकप्रिय कार्यक्रम गर्जा महाराष्ट्रला आणि मराठीतील पहिला आधुनिक आणि इलेक्ट्रानिक जगाची सफर घडवून आणणारा टेक गुरू या कार्यक्रमालाही मानांकन मिळालं आहे तसेच मनोरंजन क्षेत्रावर आधारित शोटाईम या कार्यक्रमाचा ही सहभाग आहे, सर्वोकृष्ट पुरुष सूत्रधार पुरस्कारासाठी अमोल परचुरे यांना गर्जा महाराष्ट्रसाठी तर सुहास घटवई यांना 'किल्ले शिवाजी'साठी मानांकन मिळाली आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट वृत्तविषयक पुरुष सूत्रधार यामध्ये विनायक गायकवाड यांना तर स्त्री सर्वोत्कृष्ट सूत्रधार म्हणून आरती कुलकर्णी आणि रेणुका रामचंद्रन यांना मानांकन मिळाली आहेत आणि सर्वोत्कृष्ट टीव्ही वृत्तविषयक मालिका म्हणून 'खेळ मांडियेला'साठी मानांकन मिळालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2011 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close