S M L

धोणी आणि टाय मॅचचं गणित..

05 मार्चभारत आणि इंग्लंड दरम्यानची मॅच टाय झाल्यावर भारतीय फॅन्स काहीसे नाराज झाले. पण आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर टाय मॅच धोणीसाठी लकी ठरली. धोणी कॅप्टन असताना मॅच टाय झाली तर ती टीम हमखास जेतेपद पटकावते. क्रिकेट मॅचबद्दल अचूक अंदाज व्यक्त करणं शक्य आहे का ? पॉल ऑक्टोपस आणि मणी पोपटाबद्दल आपण नाही बोलत आहोत. पण भारत आणि इंग्लंड दरम्यानची मॅच टायच होणार असं किती जणांना माहीत होतं? गंमत म्हणजे लेगस्पिनर शेन वॉर्नने मॅचपूर्वीच ट्विटरवर तसं भाकीत केलं होतं. आणि मॅच सुरु असतानाही तो आपल्या या अंदाजावर कायम ठाम होता. या अचूक अंदाजानंतर वॉर्नला आता ज्योतिषी व्हायचंय आहे.वॉर्नचा टायचा अंदाज बरोबर निघाला. पण आमच्याकडे असा एक रेकॉर्ड आहे जो वॉर्नलाही माहित नाही. भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि टाय यांचं नातं. धोणी कप्तान असताना त्याच्या टीमने जेव्हा जेव्हा एखादी लीग मॅच टाय केली. तेव्हा तेव्हा धोणीने ट्रॉफी उंचवली. आणि असं एक - दोनदा नाही तर यापूर्वी तब्बल तीनदा असं झालं आहे. अगदी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानबरोबरची लीग मॅच टाय झाली होती. पण भारताने अखेर बॉल आऊटवर ही मॅचही जिंकली आणि वर्ल्ड कपही. त्यानंतर गेल्यावर्षी आयपीएलमध्ये धोणीच्या चेन्नई सुपर किंग्ज टीमने किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबरची मॅच टाय केली होती. सुपर ओव्हरमध्ये पंजाबने ही मॅच जिंकली. पण अखेर धोणीची टीम फायनलला पोहोचली. आणि जिंकली ही. त्यानंतर लगेचच चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नई आणि व्हिक्टोरिया बुशरेंजर्स यांच्यातली मॅच टाय झाली. आणि पुन्हा एकदा धोणीचीच चेन्नई टीम चॅम्पियन्स लीग जिंकणारी पहिली भारतीय टीम ठरली. या तीनही मॅच टी -20 च्या आहेत. पण वन डे मध्येही याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर हा वर्ल्ड कप आपलाच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2011 05:15 PM IST

धोणी आणि टाय मॅचचं गणित..

05 मार्च

भारत आणि इंग्लंड दरम्यानची मॅच टाय झाल्यावर भारतीय फॅन्स काहीसे नाराज झाले. पण आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर टाय मॅच धोणीसाठी लकी ठरली. धोणी कॅप्टन असताना मॅच टाय झाली तर ती टीम हमखास जेतेपद पटकावते.

क्रिकेट मॅचबद्दल अचूक अंदाज व्यक्त करणं शक्य आहे का ? पॉल ऑक्टोपस आणि मणी पोपटाबद्दल आपण नाही बोलत आहोत. पण भारत आणि इंग्लंड दरम्यानची मॅच टायच होणार असं किती जणांना माहीत होतं? गंमत म्हणजे लेगस्पिनर शेन वॉर्नने मॅचपूर्वीच ट्विटरवर तसं भाकीत केलं होतं. आणि मॅच सुरु असतानाही तो आपल्या या अंदाजावर कायम ठाम होता. या अचूक अंदाजानंतर वॉर्नला आता ज्योतिषी व्हायचंय आहे.

वॉर्नचा टायचा अंदाज बरोबर निघाला. पण आमच्याकडे असा एक रेकॉर्ड आहे जो वॉर्नलाही माहित नाही. भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि टाय यांचं नातं. धोणी कप्तान असताना त्याच्या टीमने जेव्हा जेव्हा एखादी लीग मॅच टाय केली. तेव्हा तेव्हा धोणीने ट्रॉफी उंचवली.

आणि असं एक - दोनदा नाही तर यापूर्वी तब्बल तीनदा असं झालं आहे. अगदी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानबरोबरची लीग मॅच टाय झाली होती. पण भारताने अखेर बॉल आऊटवर ही मॅचही जिंकली आणि वर्ल्ड कपही. त्यानंतर गेल्यावर्षी आयपीएलमध्ये धोणीच्या चेन्नई सुपर किंग्ज टीमने किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबरची मॅच टाय केली होती. सुपर ओव्हरमध्ये पंजाबने ही मॅच जिंकली. पण अखेर धोणीची टीम फायनलला पोहोचली. आणि जिंकली ही.

त्यानंतर लगेचच चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नई आणि व्हिक्टोरिया बुशरेंजर्स यांच्यातली मॅच टाय झाली. आणि पुन्हा एकदा धोणीचीच चेन्नई टीम चॅम्पियन्स लीग जिंकणारी पहिली भारतीय टीम ठरली. या तीनही मॅच टी -20 च्या आहेत. पण वन डे मध्येही याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर हा वर्ल्ड कप आपलाच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2011 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close