S M L

इंडियन मुजाहिद्दीननं केला 'शादी डॉट कॉम' चा गैरवापर

7 नोव्हेंबर, मुंबई सुधाकर कांबळे /अजित मांढरे मुंबईत 11 जुलै 2006 साली झालेले बॉम्बस्फोट, बंगळुरू इथे झालेली बॉम्बस्फोट मालिका आणि अहमदाबादमध्ये झालेल्या 17 बॉम्बस्फोटांची साखळी मालिका यांचे कट इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेने रचले होते हे तपासात आढळून आलं होतं. बहुतेक करून हे सर्व कट इंडियन मुजाहिद्दीनने मोबाईल वरून घडवून आणले असल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे. या कटांसाठी संघटनेने विविध कंपन्यांची जवळजवळ 50 सीम कार्ड वापरली होती. ही सीम कार्ड वापरण्यासाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांची माहिती 'शादी डॉट कॉम' या लोकप्रिय वेबसाईटवरून वापरली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे, अशी धक्कादायक खळबळजनक माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. 'शादी डॉट कॉम' या लोकप्रिय वेबसाईटच्या गैरवापराप्रकरणी मुंबई पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत इंडियन मुजाहिद्दीनच्या 20 जणांना अटक केली आहे. त्यापैकी अनेकजण 'स्लीपर सेल'मध्ये काम करत होते. त्यापैकी अनिक रफीक मोह्म्मद सैय्यद याने यावेळी 'शादी डॉट कॉम' या संकेत स्थळावरील लग्नासाठी इच्छुक तरूणांचे फोटो आणि माहितीचा वापर करून पुरावे बनवले होते. या पुराव्यांच्या आधारे त्यांनी मोबाईलचं सीम कार्ड घेतलं होतं. आणि त्या कार्डचा त्यांनी बॉम्बस्फोटादरम्यान संपर्कासाठी वापरला होता, असं राकेश राकेश मारिया यांनी सांगितलं. या दहशतवाद्यांना बॉम्बस्फोटासाठी लाखो रूपयांची मदत मिळ्ाली होती. ही मदत दोन अनिवासी भारतीयांनी केल्याचंही तपासात उघड झालं आहे. मुंबईत, 11 जुलै 2006 साली झालेले बॉम्बस्फोट, बंगळुरू इथे झालेली बॉम्बस्फोट मालिका आणि अहमदाबाद इथे झालेल्या 17 बॉम्बस्फोट मालिकेत पैशाचा कसा वापर करण्यात आला असल्याची माहितीही याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, अशी माहिती राकेश मारिया यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या 20 जणांना अटक करून मोठं यश मिळवलं आहे. आता पोलीस या दहशतवाद्याची पाळंमुळं खणून काढत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 07:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 07:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close