S M L

नागपूरमध्ये सेक्स वर्कर्संना गांधी विचारांची शिकवण

06 मार्चसेक्स वर्कर्सपर्यंत गांधी तत्त्वज्ञान पोचवण्याचा प्रयत्न नागपूरमध्ये करण्यात येत आहे. नागपूरच्या रेड क्रॉस सोसायटी आणि सहयोग ट्रस्टनं समाजापासून दूर असलेल्या या महिलांसाठी एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांच्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गंगा जमुना नावाने असलेल्या वस्तीतील वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांनी ही परीक्षा दिली. यात 22 महिलांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना 6 ते 8 महिन्यापासून आठवड्याला शिकवणी वर्गही घेण्यात आले. बापूंचं सत्य, अहिंसा हे तत्वज्ञान समजावं. तसेच या व्यवसायातून बाहेर पडून सन्मानानं जगता यावं, यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2011 10:45 AM IST

नागपूरमध्ये सेक्स वर्कर्संना गांधी विचारांची शिकवण

06 मार्च

सेक्स वर्कर्सपर्यंत गांधी तत्त्वज्ञान पोचवण्याचा प्रयत्न नागपूरमध्ये करण्यात येत आहे. नागपूरच्या रेड क्रॉस सोसायटी आणि सहयोग ट्रस्टनं समाजापासून दूर असलेल्या या महिलांसाठी एक वेगळा उपक्रम राबवला. त्यांच्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गंगा जमुना नावाने असलेल्या वस्तीतील वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांनी ही परीक्षा दिली. यात 22 महिलांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना 6 ते 8 महिन्यापासून आठवड्याला शिकवणी वर्गही घेण्यात आले. बापूंचं सत्य, अहिंसा हे तत्वज्ञान समजावं. तसेच या व्यवसायातून बाहेर पडून सन्मानानं जगता यावं, यासाठीच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2011 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close