S M L

आदिवासींची जमीनबद्दल सरकारचा घुमजाव

06 मार्चनंदूरबार जिल्हयातल्या नवापूर तालुक्यामधल्या बेडकी गावातल्या 18 आदिवासी शेतकर्‍यांची जवळपास 52 एकर जमीन तपासणी नाक्यांसाठी सरकारनं संपादीत केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. जमीन संपादीत करताना हेक्टरी 6 लाख रूपये भाव देण्याचं कबूल करूनही इथल्या 17 शेतकर्‍यांना हेक्टरी केवळ 1 लाख 10 हजार रूपयेंचा भाव राज्य सरकारनं दिला. मात्र काँग्रेसचे माजी मंत्री स्वरूपसींग नाईक यांचे पूतणे विनोद बाळू नाईक यांना जवळपास 1 एकर जमीनाला मात्र 30 लाख 83 हजार 258 रूपये इतका मोबदला देण्यात आला. ही तफावत राजकीय संबंधातून झाल्याचा आरोप उर्वरीत 17 आदिवासी शेतकरी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या संबंधाची तक्रार त्यांनी राज्याचे लोकायुक्त आणि मानवाधिकार आयोगाकडेही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2011 03:48 PM IST

आदिवासींची जमीनबद्दल सरकारचा घुमजाव

06 मार्च

नंदूरबार जिल्हयातल्या नवापूर तालुक्यामधल्या बेडकी गावातल्या 18 आदिवासी शेतकर्‍यांची जवळपास 52 एकर जमीन तपासणी नाक्यांसाठी सरकारनं संपादीत केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. जमीन संपादीत करताना हेक्टरी 6 लाख रूपये भाव देण्याचं कबूल करूनही इथल्या 17 शेतकर्‍यांना हेक्टरी केवळ 1 लाख 10 हजार रूपयेंचा भाव राज्य सरकारनं दिला. मात्र काँग्रेसचे माजी मंत्री स्वरूपसींग नाईक यांचे पूतणे विनोद बाळू नाईक यांना जवळपास 1 एकर जमीनाला मात्र 30 लाख 83 हजार 258 रूपये इतका मोबदला देण्यात आला. ही तफावत राजकीय संबंधातून झाल्याचा आरोप उर्वरीत 17 आदिवासी शेतकरी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या संबंधाची तक्रार त्यांनी राज्याचे लोकायुक्त आणि मानवाधिकार आयोगाकडेही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2011 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close