S M L

जयंत नारळीकर यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार

07 मार्चज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली. विज्ञान प्रसार, अंधश्रध्दा निर्मुलन, आणि संशोधनात नारळीकर यांचे मोठे योगदान लाभले आहेत. साध्या सोप्या भाषेत विज्ञान पोहोचवण्याचं महत्वाचं काम नारळीकरांनी केले. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना लहानपणापासून विज्ञान आणि गणिताची आवड होती. केंब्रिज विद्यापीठात खगोल शास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. भारतातली पहिली नोकरी - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चकडून बोलावणं आलं. तिथे ते रुजू झाले. खगोल शास्त्रासाठी संपूर्णपणे काम करणारी संस्था पुण्यात असावी अशी संकल्पना त्यांच्या मनात होती. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांना आयुकाच्या स्थापनेची मंजुरी मिळाली. आज आंतरराष्ट्रीय दर्जा असणारी आयुका ही संस्था ओळखली जाते. या संस्थेचे संस्थापक आणि संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिलं. लहान मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेत. त्यासाठी सायन्स पार्क, मुक्तांगण सारखी प्रयोगशाळाही त्यांनी उभी केली आहे. शास्त्रज्ञाबरोबरच विज्ञान कथा लेखक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या वामन परत न आला, प्रेषित यांसारख्या विज्ञान कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. याच बरोबर खगोल शास्त्राची सफर घडवणारं 'आकाशाशी जडले नाते' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. नुकतचं त्यांचं महास्फोटाचा सिद्धांत खोटं ठरवणारं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. जयंत नारळीकरांना आतापर्यंत पुरस्कारांनी सन्मानित - 1960 केम्ब्रीज - खगोलशास्त्रातील टायसन पथक - 1962- स्मिथ पारितोषिक- 1965- पद्मभूषण - 2004- पद्मविभूषण- शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार - कलिंग पुरस्कार - फाय फाउंडेशनचे राष्ट्रभूषण पारितोषिक

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2011 08:39 AM IST

जयंत नारळीकर यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार

07 मार्चज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली. विज्ञान प्रसार, अंधश्रध्दा निर्मुलन, आणि संशोधनात नारळीकर यांचे मोठे योगदान लाभले आहेत. साध्या सोप्या भाषेत विज्ञान पोहोचवण्याचं महत्वाचं काम नारळीकरांनी केले.

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना लहानपणापासून विज्ञान आणि गणिताची आवड होती. केंब्रिज विद्यापीठात खगोल शास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. भारतातली पहिली नोकरी - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चकडून बोलावणं आलं. तिथे ते रुजू झाले. खगोल शास्त्रासाठी संपूर्णपणे काम करणारी संस्था पुण्यात असावी अशी संकल्पना त्यांच्या मनात होती. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांना आयुकाच्या स्थापनेची मंजुरी मिळाली. आज आंतरराष्ट्रीय दर्जा असणारी आयुका ही संस्था ओळखली जाते. या संस्थेचे संस्थापक आणि संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिलं. लहान मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेत. त्यासाठी सायन्स पार्क, मुक्तांगण सारखी प्रयोगशाळाही त्यांनी उभी केली आहे. शास्त्रज्ञाबरोबरच विज्ञान कथा लेखक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या वामन परत न आला, प्रेषित यांसारख्या विज्ञान कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. याच बरोबर खगोल शास्त्राची सफर घडवणारं 'आकाशाशी जडले नाते' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. नुकतचं त्यांचं महास्फोटाचा सिद्धांत खोटं ठरवणारं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे.

जयंत नारळीकरांना आतापर्यंत पुरस्कारांनी सन्मानित

- 1960 केम्ब्रीज - खगोलशास्त्रातील टायसन पथक - 1962- स्मिथ पारितोषिक- 1965- पद्मभूषण - 2004- पद्मविभूषण- शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार - कलिंग पुरस्कार - फाय फाउंडेशनचे राष्ट्रभूषण पारितोषिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2011 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close