S M L

सुभाष देसाईंना पदावरून हटवण्याची शक्यता

07 मार्चशिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांना पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवले आहे. त्यासाठी नवीन गटनेत्याच्या नावाचा विचार शिवसेनेनं सुरू केला आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आहेत. तसेच बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांपैकी देसाई मानले जात असल्यानं हा बदल करायचा झाल्यास बाळासाहेबांचं मत काय आहे याची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार अधिवेशनात आक्रमक होत असताना शिवसेनेचे आमदार कुठे तरी कमी पडत असल्याने नेतृत्व बदल केलं जाण्याची चर्चा आहे. आणि प्रकृती अस्वस्थ्यामुळे सुभाष देसाई स्वत: या पदावरुन हटण्यास तयार असल्याचंही बोलले जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2011 01:03 PM IST

सुभाष देसाईंना पदावरून हटवण्याची शक्यता

07 मार्च

शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांना पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवले आहे. त्यासाठी नवीन गटनेत्याच्या नावाचा विचार शिवसेनेनं सुरू केला आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आहेत. तसेच बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांपैकी देसाई मानले जात असल्यानं हा बदल करायचा झाल्यास बाळासाहेबांचं मत काय आहे याची चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार अधिवेशनात आक्रमक होत असताना शिवसेनेचे आमदार कुठे तरी कमी पडत असल्याने नेतृत्व बदल केलं जाण्याची चर्चा आहे. आणि प्रकृती अस्वस्थ्यामुळे सुभाष देसाई स्वत: या पदावरुन हटण्यास तयार असल्याचंही बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2011 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close