S M L

संयुक्त जनता दलाच्या पाच खासदारांचे राजीनामे

6 नोव्हेंबर, नवी दिल्लीमराठी - उत्तर भारतीय वादावरून जनता दल युनायटेड पक्षाच्या 5 खासदारांनी राजीनामे दिले आहेत. या खासदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ हे राजीनामे दिले आहेत. लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांची तब्येत बरी नसल्यानं खासदारांनी हे राजीनामे लोकसभेच्या जनरल सेक्रेटरी यांच्यांकडे सोपवले आहेत. मराठी- उत्तर भारतीय वादावरुन लालुंच्या राजद आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती दलाच्या खासदारांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. याआधी राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांनीही आपली राजीनामापत्रं लालूंकडे सोपवली आहेत. जनता दल युनायटेडच्या खासदारांनी राजीनामे दिल्यामुळे आता राजद आणि लोकजनशक्ती दलावर दबाव आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 10:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close