S M L

हसन अलीवर पोटा अंतर्गत कारवाई करा - सुप्रीम कोर्ट

08 मार्चपुण्यातला घोडे व्यापारी हसन अली अखेरीस आता तपास यंत्रणांच्या जाळ्यात सापडला. 36 हजार कोटी रुपये स्विस बँकेत दडवून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवरचा आपला दबाव आणखी वाढवला. आणि हसन अलीवर सीबीआय गुन्हेगारी कारवाई का करत नाही असा सवाल विचारला. सलग दुसर्‍या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं आज केंद्र सरकारला धारेवर धरलं. हसन अलीचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे आहेत तर मग त्याच्यावर पोटा किंवा मोक्काअंतर्गत कारवाई का केली गेली नाही असा प्रश्न केला. हसनच्या बनावट पासपोर्ट प्रकरणाचा तपास संथगतीने होत असल्याबद्दलही कोर्टानं नाराजी व्यक्त केली. हसन अलीला काल अटक करण्यात आली होती. त्याला आज 24 तासांची कोठडी देण्यात आली. त्यामुळे तो आता अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत राहील. त्याआधी त्याने कोठडी टाळण्यासाठी आजारी असल्याचा कांगावा केला. पण कोर्टाने त्याचा बेत हाणून पाडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 09:52 AM IST

हसन अलीवर पोटा अंतर्गत कारवाई करा - सुप्रीम कोर्ट

08 मार्च

पुण्यातला घोडे व्यापारी हसन अली अखेरीस आता तपास यंत्रणांच्या जाळ्यात सापडला. 36 हजार कोटी रुपये स्विस बँकेत दडवून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवरचा आपला दबाव आणखी वाढवला. आणि हसन अलीवर सीबीआय गुन्हेगारी कारवाई का करत नाही असा सवाल विचारला. सलग दुसर्‍या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं आज केंद्र सरकारला धारेवर धरलं. हसन अलीचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे आहेत तर मग त्याच्यावर पोटा किंवा मोक्काअंतर्गत कारवाई का केली गेली नाही असा प्रश्न केला. हसनच्या बनावट पासपोर्ट प्रकरणाचा तपास संथगतीने होत असल्याबद्दलही कोर्टानं नाराजी व्यक्त केली. हसन अलीला काल अटक करण्यात आली होती. त्याला आज 24 तासांची कोठडी देण्यात आली. त्यामुळे तो आता अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत राहील. त्याआधी त्याने कोठडी टाळण्यासाठी आजारी असल्याचा कांगावा केला. पण कोर्टाने त्याचा बेत हाणून पाडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close