S M L

नागपूरमध्ये ही क्रिकेटप्रेमींवर पोलिसांचा लाठीमार

08 मार्चवर्ल्डकपमध्ये भारतीय टीमची पाचवी मॅच नागपूरमध्ये रंगणार आहे आणि ही मॅच असेल भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये मॅच विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या मॅचच्या तिकीटांसाठी नागपूरमध्ये क्रिकेटप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करायला लागला. अद्यापही तिकीटांसाठी तब्बल 2 किमीच्या रांगा बघायला मिळत आहे. रात्रीपासूनच लोक ताटकळत उभे आहेत. आज सकाळी 9 वाजल्यापासून तिकीट विक्रीला सुरुवात झाली. 24 हजार तिकीटांसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. पोलिसांनी सगळे रस्ते बंद केले आहेत. सिव्हिल लाईन एरियात रस्तेही ब्लॉक झाले आहेत. जवळपास 50 हजार क्रिकेट फॅन्स इथं जमले आहेत. मात्र तरीही तिकीटासाठी केवळ एकच काऊंटर असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. बंगळुरूच्या मॅचच्या वेळेसही असाच प्रकार घडला होता.त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 04:58 PM IST

नागपूरमध्ये ही क्रिकेटप्रेमींवर पोलिसांचा लाठीमार

08 मार्च

वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमची पाचवी मॅच नागपूरमध्ये रंगणार आहे आणि ही मॅच असेल भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये मॅच विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या मॅचच्या तिकीटांसाठी नागपूरमध्ये क्रिकेटप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करायला लागला. अद्यापही तिकीटांसाठी तब्बल 2 किमीच्या रांगा बघायला मिळत आहे. रात्रीपासूनच लोक ताटकळत उभे आहेत. आज सकाळी 9 वाजल्यापासून तिकीट विक्रीला सुरुवात झाली. 24 हजार तिकीटांसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. पोलिसांनी सगळे रस्ते बंद केले आहेत. सिव्हिल लाईन एरियात रस्तेही ब्लॉक झाले आहेत. जवळपास 50 हजार क्रिकेट फॅन्स इथं जमले आहेत. मात्र तरीही तिकीटासाठी केवळ एकच काऊंटर असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. बंगळुरूच्या मॅचच्या वेळेसही असाच प्रकार घडला होता.त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close