S M L

पी. जे. थॉमस नेमणूक प्रकरणात मुख्यमंत्री अडचणीत

08 मार्च केंद्रीय दक्षता आयुक्त पी.जे.थॉमस यांच्या चुकीच्या नियुक्तीची पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारली आहे. पण थॉमस यांचं नाव हे पृथ्वीराज चव्हाण यांची जबाबदारी असलेल्या पर्सोनल आणि प्रशिक्षण विभागातून आलं होतं. असं म्हणून पंतप्रधानांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही जबाबदार धरलं आहे. पंतप्रधानांच्या या विधानाला भाजपने आक्षेप घेतला आहे. नेमक कोण जबाबदार आहे ते स्पष्ट सांगा आणि त्या व्यक्तीवर कारवाई करा अशी मागणी अरूण जेटलींनी केली. तर माकपने म्हटलं आहे की, जर चव्हाण हे थॉमस यांच्या चुकीच्या नेमणुकीसाठी जबाबदार आहेत तर त्यांना शिक्षा देण्याऐवजी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवून बढती का देण्यात आली.दरम्यान या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ताबडतोब स्पष्टीकरण दिलंय. थॉमस यांच्यासारखे अधिकारी जेव्हा राज्यातून केंद्राच्या सेवेत येतात तेव्हा त्यांची शहानिशा राज्य सरकारने केलेलीच असते असं म्हणून त्यांनी झाल्या प्रकरणाची जबाबदारी केरळ सरकारवर ढकलली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर राज्यात कमी समस्या होतात म्हणून की काय आता केंद्रातल्या अडचणीही त्यांना घेरू लागल्या आहेत. आधी 2जी, मग एस बँड आणि आता केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या चुकीच्या नेमणुकीतही त्यांचं नाव आलंय. आणि हे नाव विरोधकांनी आणलं नसून खुद्द पंतप्रधानांनी आणलं आहे. पी जे थॉमस यांची नेमणूक करताना मला पृथ्वीराज चव्हाण यांनी अंधारात ठेवलं असं पंतप्रधान अप्रत्यक्षपणे म्हणाले आहेत. विरोधक आक्रमक झालेले पाहून चव्हाणांनी स्पष्टीकरण दिले आहे. आणि जबाबदारी केरळ सरकारवर ढकलली.जैतापूर प्रकल्पाला गावकर्‍यांचा विरोध, राष्ट्रवादी आणि विशेष करून अजित पवारांची वाढती आक्रमकता, स्वतःसाठी विधान परिषदेची जागा मिळवणं आणि पुढच्या आठवड्यात सुरू होणारं बजेट अधिवेशन असे अनेक प्रश्न राज्यात असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रातल्या समस्याही भेडसावू लागल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयातला त्यांचा कार्यकाळ त्यांची पाठ सोडायला तयार नाही. 2जी आणि एस बँड घोटाळ्यात विरोधकांचे हल्ले सहन केल्यानंतर आता त्यांना एका अनपेक्षित परिस्थितीला सामोर जावं लागतंय. केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून थॉमस यांची निवड करताना परसोनेल आणि प्रशिक्षण विभागाने आपल्याला अंधारात ठेवलं असं म्हणतं पंतप्रधानांनी त्या विभागाची जबाबदारी असलेल्या चव्हाणांकडे बोट दाखवले आहे. केरळमधल्या पामोलिन घोटाळ्यात थॉमस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल असतानाही त्यांची दक्षता आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने नेमणूक रद्द केल्यानंतर या चुकीची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारली असली. तरी आता चव्हणांनीही त्यांची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी भाजपने केली. थॉमस यांच्या नेमणुकीसाठी कुणाचा दबाव होता हेही पुढे यायला हवं अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधक आक्रमक होताना पाहून पृथ्वीराज चव्हाणांनी ताबडतोब स्पष्टीकरण दिलं. थॉमस हे आधी केरळचे मुख्य सचिव होते त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणत्या केसेस होत्या का याची शहानिशा केरळ सरकारने केली असेल असं आम्हाला वाटलं असं म्हणतं त्यांनी केरळ सरकारवर जबाबदारी ढकलली.आदर्श घोटाळ्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना स्वच्छ प्रतिमेच्या निकषावर मुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. पण हे पद स्वीकारल्यानंतर त्यांना भूतकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय. या मुद्द्यांवर राज्यातले विरोधक आक्रमक होतात का हे येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच कळेल. राज्यसभेत निवेदन करताना पंतप्रधानांनी कोणते मुद्दे मांडले - डीओपीटीच्या खात्याने याची नोट बनवली. थॉमस यांच्यावर आरोप असल्याचं त्यामध्ये लिहिलेलं नव्हतं.- सुषमा स्वराज यांच्या निवेदनानंतर थॉमस यांच्यावर आरोप असल्याचं मला समजलं- दक्षता विभागाने त्यांना हिरवा कंदील दिला असा विश्वास त्यांना होता. थॉमस केरळ आणि केंद्रात सचिव होते- आमच्या स्तरावर त्रुटी राहिल्या आहेत. त्याची जबाबदारी मी स्वीकारतो- पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही दोषी धरायला हवे, विरोधकांची मागणी

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 12:04 PM IST

पी. जे. थॉमस नेमणूक प्रकरणात मुख्यमंत्री अडचणीत

08 मार्च

केंद्रीय दक्षता आयुक्त पी.जे.थॉमस यांच्या चुकीच्या नियुक्तीची पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारली आहे. पण थॉमस यांचं नाव हे पृथ्वीराज चव्हाण यांची जबाबदारी असलेल्या पर्सोनल आणि प्रशिक्षण विभागातून आलं होतं. असं म्हणून पंतप्रधानांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही जबाबदार धरलं आहे. पंतप्रधानांच्या या विधानाला भाजपने आक्षेप घेतला आहे. नेमक कोण जबाबदार आहे ते स्पष्ट सांगा आणि त्या व्यक्तीवर कारवाई करा अशी मागणी अरूण जेटलींनी केली. तर माकपने म्हटलं आहे की, जर चव्हाण हे थॉमस यांच्या चुकीच्या नेमणुकीसाठी जबाबदार आहेत तर त्यांना शिक्षा देण्याऐवजी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवून बढती का देण्यात आली.

दरम्यान या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ताबडतोब स्पष्टीकरण दिलंय. थॉमस यांच्यासारखे अधिकारी जेव्हा राज्यातून केंद्राच्या सेवेत येतात तेव्हा त्यांची शहानिशा राज्य सरकारने केलेलीच असते असं म्हणून त्यांनी झाल्या प्रकरणाची जबाबदारी केरळ सरकारवर ढकलली आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर राज्यात कमी समस्या होतात म्हणून की काय आता केंद्रातल्या अडचणीही त्यांना घेरू लागल्या आहेत. आधी 2जी, मग एस बँड आणि आता केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या चुकीच्या नेमणुकीतही त्यांचं नाव आलंय. आणि हे नाव विरोधकांनी आणलं नसून खुद्द पंतप्रधानांनी आणलं आहे. पी जे थॉमस यांची नेमणूक करताना मला पृथ्वीराज चव्हाण यांनी अंधारात ठेवलं असं पंतप्रधान अप्रत्यक्षपणे म्हणाले आहेत. विरोधक आक्रमक झालेले पाहून चव्हाणांनी स्पष्टीकरण दिले आहे. आणि जबाबदारी केरळ सरकारवर ढकलली.

जैतापूर प्रकल्पाला गावकर्‍यांचा विरोध, राष्ट्रवादी आणि विशेष करून अजित पवारांची वाढती आक्रमकता, स्वतःसाठी विधान परिषदेची जागा मिळवणं आणि पुढच्या आठवड्यात सुरू होणारं बजेट अधिवेशन असे अनेक प्रश्न राज्यात असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रातल्या समस्याही भेडसावू लागल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयातला त्यांचा कार्यकाळ त्यांची पाठ सोडायला तयार नाही. 2जी आणि एस बँड घोटाळ्यात विरोधकांचे हल्ले सहन केल्यानंतर आता त्यांना एका अनपेक्षित परिस्थितीला सामोर जावं लागतंय. केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून थॉमस यांची निवड करताना परसोनेल आणि प्रशिक्षण विभागाने आपल्याला अंधारात ठेवलं असं म्हणतं पंतप्रधानांनी त्या विभागाची जबाबदारी असलेल्या चव्हाणांकडे बोट दाखवले आहे.

केरळमधल्या पामोलिन घोटाळ्यात थॉमस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल असतानाही त्यांची दक्षता आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने नेमणूक रद्द केल्यानंतर या चुकीची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारली असली. तरी आता चव्हणांनीही त्यांची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी भाजपने केली. थॉमस यांच्या नेमणुकीसाठी कुणाचा दबाव होता हेही पुढे यायला हवं अशी मागणी विरोधकांनी केली.

विरोधक आक्रमक होताना पाहून पृथ्वीराज चव्हाणांनी ताबडतोब स्पष्टीकरण दिलं. थॉमस हे आधी केरळचे मुख्य सचिव होते त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणत्या केसेस होत्या का याची शहानिशा केरळ सरकारने केली असेल असं आम्हाला वाटलं असं म्हणतं त्यांनी केरळ सरकारवर जबाबदारी ढकलली.

आदर्श घोटाळ्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना स्वच्छ प्रतिमेच्या निकषावर मुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. पण हे पद स्वीकारल्यानंतर त्यांना भूतकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय. या मुद्द्यांवर राज्यातले विरोधक आक्रमक होतात का हे येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच कळेल.

राज्यसभेत निवेदन करताना पंतप्रधानांनी कोणते मुद्दे मांडले

- डीओपीटीच्या खात्याने याची नोट बनवली. थॉमस यांच्यावर आरोप असल्याचं त्यामध्ये लिहिलेलं नव्हतं.- सुषमा स्वराज यांच्या निवेदनानंतर थॉमस यांच्यावर आरोप असल्याचं मला समजलं- दक्षता विभागाने त्यांना हिरवा कंदील दिला असा विश्वास त्यांना होता. थॉमस केरळ आणि केंद्रात सचिव होते- आमच्या स्तरावर त्रुटी राहिल्या आहेत. त्याची जबाबदारी मी स्वीकारतो- पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही दोषी धरायला हवे, विरोधकांची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close