S M L

द्रमुक आणि काँग्रेसमधील वाद अखेर मिटला

08 मार्चकेंद्र सरकारमधून बाहेर पडू असा नाट्यमय पवित्रा घेतल्यानंतर आज अखेरीस द्रमुकने काँग्रेसच्या सर्व मागण्या मान्य केल्या. काँग्रेसने 63 जागा मागितल्या होत्या. आता ठरल्यानुसार काँग्रेसला 63 जागा मिळणार आहेत. त्यातल्या 62 जागा द्रमुक देईल तर 2 जागा छोटे मित्रपक्ष देतील. द्रमुकच्या नेत्यांसोबत प्रणव मुखजीर्ंनी दोन बैठका घेतल्यानंतर हा तोडगा निघू शकला. विधानसभा निवडणुका महिन्याभरावर आल्यामुळे आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास सीबीआयच्या हातात असल्यामुळे द्रमुकने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे सूत्रांकडून समजतंय. आता द्रमुकसोबतचा तंटा संपला असला तरी उद्यापासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या जागावाटपासंबंधी चर्चा सुरू होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2011 05:39 PM IST

द्रमुक आणि काँग्रेसमधील वाद अखेर मिटला

08 मार्च

केंद्र सरकारमधून बाहेर पडू असा नाट्यमय पवित्रा घेतल्यानंतर आज अखेरीस द्रमुकने काँग्रेसच्या सर्व मागण्या मान्य केल्या. काँग्रेसने 63 जागा मागितल्या होत्या. आता ठरल्यानुसार काँग्रेसला 63 जागा मिळणार आहेत. त्यातल्या 62 जागा द्रमुक देईल तर 2 जागा छोटे मित्रपक्ष देतील. द्रमुकच्या नेत्यांसोबत प्रणव मुखजीर्ंनी दोन बैठका घेतल्यानंतर हा तोडगा निघू शकला. विधानसभा निवडणुका महिन्याभरावर आल्यामुळे आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास सीबीआयच्या हातात असल्यामुळे द्रमुकने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे सूत्रांकडून समजतंय. आता द्रमुकसोबतचा तंटा संपला असला तरी उद्यापासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या जागावाटपासंबंधी चर्चा सुरू होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2011 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close