S M L

हसन अलीच्या चौकशीसाठी हवी 14 दिवसांची कोठडी !

08 मार्चकोट्यवधींच्या टॅक्स घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हसन अलीला कोर्टात हजर करण्यात आलं. एन्फोर्समेंट डिरेक्टरेटने हसन अलीची 14 दिवसांची कोठडी मागितली आहे. बनवाट पासपोर्ट आणि पैशांची अफरातफर केल्याचे आरोप हसन अलीवर आहेत. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार तपासामध्ये हसन अली सहकार्य करत नसल्याची तक्रारही एन्फोर्समेंट डिरेक्टरेटने केली आहे. या संपूर्ण तपासात आतापर्यंत हसन अली त्याचा माजी सहकारी काशीनाथ तापुरिया आणि फिलिप आनंद राज यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. पण आंतरराष्ट्रीय शस्त्रात्र दलाल अदनान खाशो-गीसोबत हसन अलीचे संबंध आहेत का याचा तपास करण्यासाठी अधिक चौकशी करण्याची गरजही ईडीनं व्यक्त केली.हसन अली-हसन अलीची रीमांडची सुनावणी मुंबई सेश्नस कोर्टातील विषेश कोर्टातच होणार असा निर्णय आज मुंबई सेश्नस कोर्टाचे प्रिन्सिपल जजच्या एम एल टहलियांनी यांनी दिला आहे. काल हसन अली याला मुंबई सेशन कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आलं होतं त्यांवेळी कोर्टाच्या ज्युडिशनचा मुद्दा उपस्थित झाला होता या मुद्यावर आज सुनावणी झाली या सुनावणी नंतर न्यायमूर्ती टहलियानी हा निर्णय दिला यानंतर आता हसन अली याच्या रिमांड बाबत न्यायमूर्ती टहलिया यांच्या कोर्टात दुपारच्या सत्रात सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 08:39 AM IST

हसन अलीच्या चौकशीसाठी हवी 14 दिवसांची कोठडी  !

08 मार्च

कोट्यवधींच्या टॅक्स घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हसन अलीला कोर्टात हजर करण्यात आलं. एन्फोर्समेंट डिरेक्टरेटने हसन अलीची 14 दिवसांची कोठडी मागितली आहे. बनवाट पासपोर्ट आणि पैशांची अफरातफर केल्याचे आरोप हसन अलीवर आहेत. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार तपासामध्ये हसन अली सहकार्य करत नसल्याची तक्रारही एन्फोर्समेंट डिरेक्टरेटने केली आहे.

या संपूर्ण तपासात आतापर्यंत हसन अली त्याचा माजी सहकारी काशीनाथ तापुरिया आणि फिलिप आनंद राज यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. पण आंतरराष्ट्रीय शस्त्रात्र दलाल अदनान खाशो-गीसोबत हसन अलीचे संबंध आहेत का याचा तपास करण्यासाठी अधिक चौकशी करण्याची गरजही ईडीनं व्यक्त केली.

हसन अली-हसन अलीची रीमांडची सुनावणी मुंबई सेश्नस कोर्टातील विषेश कोर्टातच होणार असा निर्णय आज मुंबई सेश्नस कोर्टाचे प्रिन्सिपल जजच्या एम एल टहलियांनी यांनी दिला आहे. काल हसन अली याला मुंबई सेशन कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आलं होतं त्यांवेळी कोर्टाच्या ज्युडिशनचा मुद्दा उपस्थित झाला होता या मुद्यावर आज सुनावणी झाली या सुनावणी नंतर न्यायमूर्ती टहलियानी हा निर्णय दिला यानंतर आता हसन अली याच्या रिमांड बाबत न्यायमूर्ती टहलिया यांच्या कोर्टात दुपारच्या सत्रात सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close