S M L

राज्य सरकारने सोळाशे कोटी थकवल्याचा एमएससी बँकेचा दावा

09 मार्चमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात एमएससी बँकेची राज्य सरकारकडे असलेल्या बँक गॅरेन्टीची थकबाकी देण्यावरून मंत्रिमडळात वाद झाल्याची बातमी आहे. राज्य सरकारने आपली जवळपास 1600 कोटी रुपयांची बँक गॅरेन्टी थकवल्याचा दावा एमएससी बँकेनं केला आहे. त्यातली 1170 कोटी रुपयांची थकबाकी राज्य सरकारने द्यावी असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये खंडाजंगी झाली. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर उद्योगमंत्री नारायण राणे आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाद घातला. पण अखेर बँकेने खर्चाचा हिशोब राज्य सरकार समोर मांडल्यावरच एकूण थकबाकीपैकी 270 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 04:49 PM IST

राज्य सरकारने सोळाशे कोटी थकवल्याचा एमएससी बँकेचा दावा

09 मार्च

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात एमएससी बँकेची राज्य सरकारकडे असलेल्या बँक गॅरेन्टीची थकबाकी देण्यावरून मंत्रिमडळात वाद झाल्याची बातमी आहे. राज्य सरकारने आपली जवळपास 1600 कोटी रुपयांची बँक गॅरेन्टी थकवल्याचा दावा एमएससी बँकेनं केला आहे. त्यातली 1170 कोटी रुपयांची थकबाकी राज्य सरकारने द्यावी असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये खंडाजंगी झाली. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर उद्योगमंत्री नारायण राणे आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाद घातला. पण अखेर बँकेने खर्चाचा हिशोब राज्य सरकार समोर मांडल्यावरच एकूण थकबाकीपैकी 270 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close