S M L

हसन अलीला पुन्हा एका दिवसाची कोठडी

10 मार्चहजारो कोटी रुपये कर चुकवल्या प्रकरणात हसन अलीला पुन्हा एक दिवसाची ईडी(एन्फोर्समेंट डिरेक्टरेट) कोठडी देण्यात आली आहे. ईडीनं सेशन्स कोर्टाकडे हसन अलीला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. यासंदर्भात हाय कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. हसन अली प्रकरणासंदर्भात अद्यापही कोर्टात पुरावे का सादर केले नाही असं म्हणत काल न्यायमुर्ती एम.एल तहलियांनी यांनी एन्फोर्समेंट डिरेक्टरेटला फटकारलं होतं. दरम्यान काशिनाथ टापुरीयाची ईडीकडून चौकशी तीन तास झाली. टापुरीया हा हसन अलीचा पार्टनर असल्याचा आरोप आहे. हसन अलीने टापुरीयाच्या मार्फत 14 कंपन्यांमध्ये 7 लाख डॉलर्स गुंतवल्याचा आरोप ठेवण्यात आला. दरम्यान हसन अलीशी आपला संबंध नसल्याचा दावा काशिनाथ टापुरीयानी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2011 09:30 AM IST

हसन अलीला पुन्हा एका दिवसाची कोठडी

10 मार्च

हजारो कोटी रुपये कर चुकवल्या प्रकरणात हसन अलीला पुन्हा एक दिवसाची ईडी(एन्फोर्समेंट डिरेक्टरेट) कोठडी देण्यात आली आहे. ईडीनं सेशन्स कोर्टाकडे हसन अलीला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. यासंदर्भात हाय कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. हसन अली प्रकरणासंदर्भात अद्यापही कोर्टात पुरावे का सादर केले नाही असं म्हणत काल न्यायमुर्ती एम.एल तहलियांनी यांनी एन्फोर्समेंट डिरेक्टरेटला फटकारलं होतं.

दरम्यान काशिनाथ टापुरीयाची ईडीकडून चौकशी तीन तास झाली. टापुरीया हा हसन अलीचा पार्टनर असल्याचा आरोप आहे. हसन अलीने टापुरीयाच्या मार्फत 14 कंपन्यांमध्ये 7 लाख डॉलर्स गुंतवल्याचा आरोप ठेवण्यात आला. दरम्यान हसन अलीशी आपला संबंध नसल्याचा दावा काशिनाथ टापुरीयानी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2011 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close