S M L

चिनाय कॉलेजमध्ये युवा सेनेचा राडा

11 मार्चमुंबई येथील विले पार्ल्याच्या चिनाय कॉलेजमध्ये तोडफोड प्रकरणी आमदार अभिजीत अडसूळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिजीत अडसूळ यांच्यासोबत युवा सेनेच्या तीस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेनं चिनाय कॉलेजमध्ये सकाळी तोडफोड केली. साडेतीनशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे त्यांना कॉलेजनं परीक्षेला बसू दिलं नाही. त्यावरून संतापलेल्या विद्यार्थ्यांसह युवा सेनेनं कॉलेजमध्ये तोडफोड केली. या विद्यार्थ्यांचा आजचा पेपर रद्द करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 11:07 AM IST

चिनाय कॉलेजमध्ये युवा सेनेचा राडा

11 मार्च

मुंबई येथील विले पार्ल्याच्या चिनाय कॉलेजमध्ये तोडफोड प्रकरणी आमदार अभिजीत अडसूळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिजीत अडसूळ यांच्यासोबत युवा सेनेच्या तीस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेनं चिनाय कॉलेजमध्ये सकाळी तोडफोड केली. साडेतीनशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे त्यांना कॉलेजनं परीक्षेला बसू दिलं नाही. त्यावरून संतापलेल्या विद्यार्थ्यांसह युवा सेनेनं कॉलेजमध्ये तोडफोड केली. या विद्यार्थ्यांचा आजचा पेपर रद्द करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close