S M L

वानखेड स्टेडियमला पोलिसांचा खडा पहारा

11 मार्च13 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकपची पहिली मॅच रंगणार आहे. कॅनडा आणि न्युझीलंडची टीम आमने सामने असेल. वानखेडेचं नूतनीकरण झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.वानखेडे स्टेडियम वर्ल्डकपमधील आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज झालंय. स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल याची उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे. पण त्याहीपेक्षा सध्या जास्त चर्चा आहे ती स्टेडियमच्या सिक्युरीटीच्या प्रश्नाची. दोन लीग मॅच आणि वर्ल्डकपची फायनल याच स्टेडियमवर खेळवले जाणार आहे. आणि म्हणूनचं फायनलच्या सिक्युरिटीची रंगीत तालिम म्हणून मुंबई पोलीस 13 मार्चला होणार्‍या न्युझीलंड आणि कॅनडा मॅचकडे पाहत आहेत.लीगमधील पहिल्या दोन मॅचसाठी दोन हजार पोलीस तैनात करण्यात आलेत. याशिवाय एअआरपीच्या दोन कंपन्या, शीघ्र कृती दलाची एक टीम, एटीएसचं पथक आणि साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. तर फायनलसाठी दर पंधरा ते वीस फुटावर एका पोलिसाला तैनात करण्यात आलं आहे. त्यासाठी 8 हजार पोलीस वानखेडवर तैनात असतील. एसआरपीच्या पाच कंपन्याही वानखेडेवर खडा पहारा देतील. शीघ्र कृती दलाच्या पाच टीम असतील. तसेच एटीएसचं पथक आणि साध्या वेशातील पोलिसही या फायनलवर नजर रोखून असतील.न्युझीलंड विरुध्द कॅनडा मॅचच्या तिकीट विक्रीस सुरुवात झाली. बंगळूरु आणि नागपूरमध्ये तिकीट विक्रीवरुन उडालेला गोंधळ लक्षात घेता मुंबई पोलीस आणि मंुबई क्रिकेट असोसिएशननं सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली. आणि त्यामुळेच वानखेडे स्टेडियमला चक्क छावणीचं स्वरुप आले आहे. जसजसं फायनलची वेळ जवळ येईल तसतसा सुरक्षेचा हा कडा आणखी कडेकोट होत जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 12:19 PM IST

वानखेड स्टेडियमला पोलिसांचा खडा पहारा

11 मार्च

13 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकपची पहिली मॅच रंगणार आहे. कॅनडा आणि न्युझीलंडची टीम आमने सामने असेल. वानखेडेचं नूतनीकरण झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.

वानखेडे स्टेडियम वर्ल्डकपमधील आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज झालंय. स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल याची उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे. पण त्याहीपेक्षा सध्या जास्त चर्चा आहे ती स्टेडियमच्या सिक्युरीटीच्या प्रश्नाची. दोन लीग मॅच आणि वर्ल्डकपची फायनल याच स्टेडियमवर खेळवले जाणार आहे. आणि म्हणूनचं फायनलच्या सिक्युरिटीची रंगीत तालिम म्हणून मुंबई पोलीस 13 मार्चला होणार्‍या न्युझीलंड आणि कॅनडा मॅचकडे पाहत आहेत.

लीगमधील पहिल्या दोन मॅचसाठी दोन हजार पोलीस तैनात करण्यात आलेत. याशिवाय एअआरपीच्या दोन कंपन्या, शीघ्र कृती दलाची एक टीम, एटीएसचं पथक आणि साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. तर फायनलसाठी दर पंधरा ते वीस फुटावर एका पोलिसाला तैनात करण्यात आलं आहे. त्यासाठी 8 हजार पोलीस वानखेडवर तैनात असतील. एसआरपीच्या पाच कंपन्याही वानखेडेवर खडा पहारा देतील. शीघ्र कृती दलाच्या पाच टीम असतील. तसेच एटीएसचं पथक आणि साध्या वेशातील पोलिसही या फायनलवर नजर रोखून असतील.

न्युझीलंड विरुध्द कॅनडा मॅचच्या तिकीट विक्रीस सुरुवात झाली. बंगळूरु आणि नागपूरमध्ये तिकीट विक्रीवरुन उडालेला गोंधळ लक्षात घेता मुंबई पोलीस आणि मंुबई क्रिकेट असोसिएशननं सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली. आणि त्यामुळेच वानखेडे स्टेडियमला चक्क छावणीचं स्वरुप आले आहे. जसजसं फायनलची वेळ जवळ येईल तसतसा सुरक्षेचा हा कडा आणखी कडेकोट होत जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close