S M L

भारत 441वर ऑल आऊट, जेसन क्रेझाचेआठ विकेट

07 नोव्हेंबर नागपूर,नागपूर टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग 441 रन्सवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. मॅथ्यू हेडन सोळा रन्सवर रन आऊट झाला. परंतु दुस-या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये दोन विकेटवर 189 रन्स केले. ओपनर सायमन कॅटिचने शानदार बॅटिंग करत नाबाद 92 रन्स केले. दुस-या बाजूला माईक हसी 45 रन्सवर नॉट आऊट आहे. त्यापूर्वी सौरव गांगुली आणि महेंद्र सिंग धोणी यांनी भारताची इनिंग चारशेच्यावर नेली. गांगुली आऊट झाल्यावर मात्र जेसन क्रेझाने भारताचं शेपूट झटपट गुंडाळलं. आपल्या शेवटच्या टेस्टमध्ये करिअरचा समारोप दिमाखदार करण्याचा सौरव गांगुलीचा प्रयत्न आज पंधरा रन्सनी हुकला. त्याचबरोबर एका अनोख्या रेकॉर्डलाही तो मुकला. पहिल्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड. महाराजा सौरव गांगुलीचा आज पीचवर सुरेख जम बसला होता. दमदार बॅटिंग करत त्याने करिअरमधली 35वी हाफ सेंच्युरी ठोकली. पण तो हमखास सेंच्युरी करणार असं वाटत असतानाच जेसन क्रेझाच्या एका बॉलवर स्लीपमध्ये त्याचा कॅच उडला आणि मायकेल क्लार्कने तो पकडण्यात कुचराई केली नाही. क्रेझाने पदार्पणात आठ विकेट घेण्याचा पराक्रम केला. गांगुली पूर्वी भारतीय कॅप्टन महेंद्र सिंग धोणीचा अडसरही त्याने दूर केला. गांगुली आऊट झाल्यावर क्रेझाने झहीर आणि अमित मिश्रा यांनाही झटपट आऊट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 11:36 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close