S M L

वेस्ट इंडिजची क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित

11 मार्चवर्ल्ड कपमधल्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने आयर्लंडंचा 44 रन्सनं पराभव करीत क्वार्टर फायनलमधला आपला प्रवेश नक्की केला. वेस्ट इंडिजने आयर्लंडपुढे विजयासाठी 276 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण आयर्लंडची टीम 231 रन्सपर्यंतच मजल मारू शकली. आयर्लंडची ओपनिंग जोडी झटपट आऊट झाली. पण यानंतर एड जॉयस आणि गॅरी विल्सननं दमदार बॅटिंग करत विजयासाठी झुंज दिली. जॉयस 84 तर विल्सन 61 रन्सवर आऊट झाले. यानंतर पुन्हा आयर्लंडची इनिंग घसरली आणि त्यांची टीम 231 रन्सवर ऑलआऊट झाली. विंडीजच्या सुलेमान बेननं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याआधी वेस्ट इंडिजनं 275 रन्स केले. ओपनर ड्वेन स्मिथनं 107 रन्सची खेळी केली. तर कायरन पोलार्डची सेंच्युरी फक्त 6 रन्सनं हुकली. 5 सिक्स आणि 8 फोर मारत पोलार्डनं 94 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2011 06:27 PM IST

वेस्ट इंडिजची क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश निश्चित

11 मार्च

वर्ल्ड कपमधल्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने आयर्लंडंचा 44 रन्सनं पराभव करीत क्वार्टर फायनलमधला आपला प्रवेश नक्की केला. वेस्ट इंडिजने आयर्लंडपुढे विजयासाठी 276 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण आयर्लंडची टीम 231 रन्सपर्यंतच मजल मारू शकली. आयर्लंडची ओपनिंग जोडी झटपट आऊट झाली. पण यानंतर एड जॉयस आणि गॅरी विल्सननं दमदार बॅटिंग करत विजयासाठी झुंज दिली. जॉयस 84 तर विल्सन 61 रन्सवर आऊट झाले. यानंतर पुन्हा आयर्लंडची इनिंग घसरली आणि त्यांची टीम 231 रन्सवर ऑलआऊट झाली. विंडीजच्या सुलेमान बेननं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याआधी वेस्ट इंडिजनं 275 रन्स केले. ओपनर ड्वेन स्मिथनं 107 रन्सची खेळी केली. तर कायरन पोलार्डची सेंच्युरी फक्त 6 रन्सनं हुकली. 5 सिक्स आणि 8 फोर मारत पोलार्डनं 94 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2011 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close