S M L

दक्षिण आफ्रिकेविरुध्द बॅटिंगचा निर्णय

12 मार्चवर्ल्ड कपमधला आजचा दिवस खर्‍या अर्थानं ऍक्शन पॅड असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन तगड्या टीम आमने सामने असणार आहेत. ग्रुप बीमध्ये अव्वल कोण ठरणार याचा फैसला कदाचित या मॅचमध्ये होईल. तर भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं सिंहासन पटकावू शकतील म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जात त्या दोन टीम शनिवारी नागपूरमध्ये आमने सामने येतील. भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं क्वार्टर फायनलमध्ये आपल्या जागा पक्क्या केल्यात. पण ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा असणार आहे.दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन ग्रॅमी स्मीथ म्हणतो की, ही सगळ्यात एक्साइटींग मॅच असणार आहे. दोन्ही टीम्स अनेकवेळा एकमेकांसमोर आल्या आहेत त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा खेळ माहीत आहे. तर भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी म्हणतो की, ही मॅचही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत. दरम्यान पत्रकार परिषदेत भारतीय कॅप्टनला अजूनही स्पीन बॉलिंगच्या पर्यायावर प्रश्न विचारले जातायेत. आर. अश्विन चांगला बॉलर आहे असं धोणी सांगतोय खरं पण अजूनही तो पियुष चावलाचीच पाठराखण करतोय. भारतीय स्पिनर्सच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हरभजननं आत्तापर्यंत झालेल्या चार मॅचेसमध्ये केवळ दोन विकेट घेतल्यात. पण याचंही स्पष्टीकरण धोणीकडे आहे. बॉलिंगमध्ये हरभजनवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. कठिण परिस्थितीत त्याची बॉलिंग अजूनच बहरते.प्रतिस्पर्धी टीमला मात्र भारतीय टीमच्या या कमकुवत बाजू माहिती आहेत. त्यामुळे भारताला कडवी लढत देण्यासाठी आफ्रिकन टीम सज्ज आहे. भारत-दक्षिण आफ्रिकेनं एकमेकांविरोधात रणनिती तयार केली. एकूणच शनिवारची मॅच क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2011 08:47 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरुध्द बॅटिंगचा निर्णय

12 मार्च

वर्ल्ड कपमधला आजचा दिवस खर्‍या अर्थानं ऍक्शन पॅड असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन तगड्या टीम आमने सामने असणार आहेत. ग्रुप बीमध्ये अव्वल कोण ठरणार याचा फैसला कदाचित या मॅचमध्ये होईल. तर भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं सिंहासन पटकावू शकतील म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जात त्या दोन टीम शनिवारी नागपूरमध्ये आमने सामने येतील. भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं क्वार्टर फायनलमध्ये आपल्या जागा पक्क्या केल्यात. पण ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन ग्रॅमी स्मीथ म्हणतो की, ही सगळ्यात एक्साइटींग मॅच असणार आहे. दोन्ही टीम्स अनेकवेळा एकमेकांसमोर आल्या आहेत त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा खेळ माहीत आहे. तर भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी म्हणतो की, ही मॅचही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.

दरम्यान पत्रकार परिषदेत भारतीय कॅप्टनला अजूनही स्पीन बॉलिंगच्या पर्यायावर प्रश्न विचारले जातायेत. आर. अश्विन चांगला बॉलर आहे असं धोणी सांगतोय खरं पण अजूनही तो पियुष चावलाचीच पाठराखण करतोय. भारतीय स्पिनर्सच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हरभजननं आत्तापर्यंत झालेल्या चार मॅचेसमध्ये केवळ दोन विकेट घेतल्यात. पण याचंही स्पष्टीकरण धोणीकडे आहे. बॉलिंगमध्ये हरभजनवर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. कठिण परिस्थितीत त्याची बॉलिंग अजूनच बहरते.

प्रतिस्पर्धी टीमला मात्र भारतीय टीमच्या या कमकुवत बाजू माहिती आहेत. त्यामुळे भारताला कडवी लढत देण्यासाठी आफ्रिकन टीम सज्ज आहे. भारत-दक्षिण आफ्रिकेनं एकमेकांविरोधात रणनिती तयार केली. एकूणच शनिवारची मॅच क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2011 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close